Join us

बेस्ट कामगारांचा आज मोर्चा, बोनससाठी धरणे : रोजंदारी कामगारांचा प्रश्नही पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:59 AM

बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कर्मचाºयांना कायम करून सर्व कामगारांना बोनस देण्याच्या मागणीसाठी बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनने मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कर्मचा-यांना कायम करून सर्व कामगारांना बोनस देण्याच्या मागणीसाठी बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनने मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. मुंबई मनपा मुख्यालयाला घेराव घालून महापौरांकडे रोजंदारी आणि कायमस्वरूपी कामगारांसाठी दाद मागणार असल्याचे युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले.गायकवाड म्हणाले की, बेस्ट प्रशासनाने २००७ आणि २०१२ साली केलेल्या करारानुसार, एका वर्षात कमीत कमी २४० दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस काम करणाºया रोजंदारी कामगारांना कायम पदावर सामावून घेण्याची गरज आहे. मात्र बेस्ट प्रशासन कराराची अंमलबजावणी करत नसल्यानेच रोजंदारी कामगारांना आझाद मैदानावर धडक मोर्चा काढावा लागत आहे.पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळालेली नसून बेस्ट, महापालिका आणि पोलीस आंदोलन दडपू पाहत आहेत. मात्र लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार असून पाठकवाडी बेस्ट आगारासमोरून हजारो कामगार महापालिका मुख्यालयावर धडक देतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.बेस्ट उपक्रमात गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून रोजंदारी कामगार काम करत आहेत. त्यांना कायम सेवेत न घेतल्याने ३ आॅक्टोबरपासून संबंधित कामगारांनी भरतीघेणे (काम स्वीकारणे) बंद केले आहे. त्यामुळे चर खोदण्यापासून बेस्ट उपक्रमाची विविध कामे खोळंबलेली आहेत.या कामगारांना कायम सेवेत घेतल्याने बेस्ट उपक्रमाला एका कामगारामागे महिन्याला केवळ ५० रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. तरीही बेस्ट प्रशासन या कामगारांकडे दुर्लक्ष करत आहे, असेही गायकवाड यांचे म्हणणेआहे.

टॅग्स :बेस्टमुंबई