बेस्ट कामगारांचा बोनस पगारातून कापणार नाही - बेस्ट प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:15 AM2018-02-13T01:15:27+5:302018-02-13T01:15:34+5:30

गेल्या दिवाळी सणानिमित्त पालिकेमार्फत देण्यात आलेला बोनस बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या पगारातून कापण्यास सुरुवात केली आहे. बेस्ट उपक्रमाने सुधारणा न केल्यास कर्मचाºयांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते.

Best workers will not be able to pay bonuses - Best Administration | बेस्ट कामगारांचा बोनस पगारातून कापणार नाही - बेस्ट प्रशासन

बेस्ट कामगारांचा बोनस पगारातून कापणार नाही - बेस्ट प्रशासन

Next

मुंबई : गेल्या दिवाळी सणानिमित्त पालिकेमार्फत देण्यात आलेला बोनस बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या पगारातून कापण्यास सुरुवात केली आहे. बेस्ट उपक्रमाने सुधारणा न केल्यास कर्मचाºयांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरली होती. याचे पडसाद सोमवारी बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. त्यानंतर बोनसची रक्कम पगारातून कापण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने मागे घेतला.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने कर्मचाºयांना पगारही वेळेवर मिळत नाही. कामगारांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी पालिकेकडून २५ कोटी रुपयांची मदत घेतली होती. ही रक्कम बेस्ट उपक्रमाने सुधारणा केल्यास कापले जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र बेस्टने सुधारणा न केल्याने आयुक्तांनी बोनसची रक्कम पगारातून कापण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे साडेपाच हजारांच्या हिशोबाने कामगारांच्या पगारातून दरमहा पाचशे रुपये कापले जात आहेत.
याबाबत भाजपाचे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. बोनसची रक्कम पगारातून कापण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महाव्यवस्थापकांनी बोनसची रक्कम पगारातून कापली जाणार नसल्याचे जाहीर केले.
यामुळे बेस्ट कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Best workers will not be able to pay bonuses - Best Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट