Join us

बेस्टच्या तब्बल 3 हजार 830 वाहनांमध्ये 411 वाहनांना पीयूसीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 12:21 PM

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाकडे एकूण ३ हजार ८३० वाहने आहेत. परंतु बेस्टचे ४११ वाहनांना पीयूसी नाही आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यांनी दिली आहे.

चेतन ननावरे मुंबई - बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाकडे एकूण ३ हजार ८३० वाहने आहेत. परंतु बेस्टचे ४११ वाहनांना पीयूसी नाही आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यांनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाकडे किती वाहने आहेत?,  तसेच सदर वाहनांच्या पीयूसीसाठी बेस्टनी किती रक्कम खर्च केली आहे? याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन  उपक्रमाचे  प्राशासकीय व्यास्थापक परि. अभियंता व जनमाहिती अधिकारी यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे. यात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाकडे ६ दुचाकी (Motor Cycle), १५ दुचाकी (Oil Filter Machin on trolly/ trailer), ८ चारचाकी (Management Cars), १४५ चारचाकी (Jeeps),  ५७ चारचाकी (Delivery and Cash Van), ९ चारचाकी ( Fault Finding Van), ७ चारचाकी (Fork Lift),  २०७८ बस (CNG), १३३७ बस (Diesel), ४ बस (Electric), १६४ अन्य वाहने ( includes Lorries, Tankers, Tree trimming, Mobile canteen, Diesel conservation etc.) अशा प्रकारच्या वाहनांचा  समावेश असून एकूण ३ हजार ८३० वाहने आहेत. तसेच बेस्ट उपक्रम यांनी सन २०१६ पासून २०१७ पर्यंत फक्त बसची पीयूसी केली आहे. सदर पीयूसी साठी सन २०१६ मध्ये ४लाख ८५ हजार ४६०/- इतकी रक्कम खर्च केली आहे. तरी सन २०१७ मध्ये ४ लाख ३७ हजार ७६०/- इतकी रक्कम खर्च केलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार २०१६ आणि २०१७ मध्ये फक्त बसची पीयूसी झाली आहे. परंतु इतर वाहनांना पीयूसी केलेली नाही. 

जर शासकीय विभाग स्वत:च्या  वाहनांची पीयूसी करून घेत नाही, तर पीयूसीसाठी सामान्य नागरिकांकडून कशी अपेक्षा करणार? सदर बेस्टचे वाहनांमध्ये पीयूसी  नसल्याने  मुंबईतील वायु प्रदूषण वाढत आहे. हि गोष्ठ पर्यावणासाठी गंभीर बाब आहे. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांस पत्र पाठवून दोषी अधिकारी/ कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याच-बरोबर लवकरात लवकर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या सगळया वाहनांना पीयूसी करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.