Join us

चार मार्गांवर बेस्टच्या वातानुकूलित बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित बसगाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने काही जुन्या बस मार्गांवर ...

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित बसगाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने काही जुन्या बस मार्गांवर वातानुकूलित बसगाड्या सुरू केल्या आहेत. सोमवारपासून शहर विभगातील १०६, १३४, १३७ व १३८ या चार बस मार्गांवर बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित मिडी बसगाड्या सुरू केल्या आहेत.

बॅकबे आगार ते कमला नेहरू उद्यानदरम्यान बस क्रमांक ए- १०६ वर २२ ते ३१ मिनिटांच्या अंतराने चार वातानुकूलित बस धावणार आहेत, तर बस क्रमांक ए १३४ बस मार्गावरवर बॅकबे आगार ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडीदरम्यान १९ ते ३८ मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस चालविण्यात येतील. नेव्ही नगर ते अहिल्याबाई होळकर चौक चर्चगेटदरम्यान बस क्रमांक ए १३७ या बसमार्गावर ८ ते १० मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस धावणार आहेत.

बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ए १३८ या बसमार्गावर सात ते १४ मिनिटांच्या अंतराने सात वातानुकूलित बसगाड्या धावतील. या मिनी वातानुकूलित बसगाड्या ठेकेदारांमार्फत चालवण्यात येत असल्यामुळे या बसगाड्यांवर बसचालक ठेकेदाराचा व वाहक हा बेस्ट उपक्रमाचा असणार आहे. या बस आठवड्यातील सातही दिवस चालविण्यात येणार आहेत.