मुंबई : सौदी आणि येमेन दरम्यान सुरु असलेल्या युद्धात जखमी झालेल्या येमेनच्या ५ जवानांची मुंबईतील रुग्णालयात फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठग येमेनचेच नागरिक असून जवानांचे पासपोर्ट घेवून पसार झाले होते. याप्रकरणी पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोघांनाही फसवणुकीचा गुन्हयात अटक केली आहे. येमेनचे रहिवासी असलेले जवान मोहम्मद गुरबान सलेह गुरबान (२६) यांच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ते मागील १० वर्षापासून येमेन देशामध्ये रायझ (निरीक्षक) या पदावर सैन्य दलात नोकरी करीत आहे. २ वर्षापूर्वी सौदी व येमेन दरम्यान चालू असलेल्या अंतर्गत युध्दात त्यांच्यासह अन्य सहकारी जखमी झाले.तेथील उपचार ठीक नसल्याने त्यांना सौदी अरब देशातील सैन्य खात्याकडून मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात त्यांच्यासह अब्दुल फताह ईस्माइल ओमर, तौफिक मोहम्मद अब्दुल लतिफ, अनिस अली नाजी मोहम्मद, खालेद मोहम्मद सलेह ओबड, अब्दुल्लाह खालेद अहमद मुसेद दाखल झाले.जानेवारी पासून उपचार सुरु झाले. येथे असताना येमेन सौदी सैन्य दल यांचे फोर्टिज रूग्णालयासोबत काही अडचण आल्याने उपचारात अडथळे येत असल्याने त्यांनी पुणे येथे उपचार घेणाऱ्या जवानाकड़ून याबाबत मदतीसाठी विचारणा करताच, फहाद रजवान अल मक्तरी (३४) ,अली अब्दुलगनी अली अल गुजी (२९) त्यांनी या दोघांचा मोबाईल क्रमांक दिला.दुकलीने ते दिल्लीतील एम्बेसीच्या सदस्य असल्याचे सांगितले. फोर्टीस मध्ये उपचार मिळणार नसल्याचे सांगून, अपोलो रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. येथील उपचाराचा होणारा खर्च आम्ही सौदी अरब देशाकडून परस्पर घेवून, तुम्हाला कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. ती व्यक्ति येमेन देशाची भाषा बोलत असून स्वत: ऐम्बेसीची प्रतिनीधी असल्याची ओळख सांगत असल्याने त्यांनी विश्वास ठेवला. ३ मार्च रोजी ते नवी मुंबईतील अपोलो मध्ये दाखल झाले.दुकलीने पासपोर्टही ताब्यात घेतले. मात्र पैसे न आल्याने त्यांची शस्त्रक्रिया थांबली. पर्यायी त्यांना डिस्चार्ज देत ठगांनी नवी मुंबईतील हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यात दोन्ही ठगांनी फोन उचलणे बंद केले. त्यामुळे त्यांनी दोघांबाबत चौकशी करताच दिल्ली ऐम्बेसीमध्ये कोणीही सदस्य नसल्याचे समजले. सौदी अरब संरक्षण खात्याकडे केलेल्या चौकशीत, त्यांच्या पासपोर्टच्या आधारे २ लाख ५ हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली.यात फसवणूक झाल्याने त्यांनी पवई पोलीस ठाण्यात २४ जून रोजी तक्रार दिली. पुणे येथून अटकजवानांची फसवणुक करणारे ठग येमेनचेच नागरिक आहे. त्यांना संबंधित रुग्णालयात जवान दाखल होत असल्याची माहिती आहे. जवानाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरु केला. तपासाअंती पुणे येथून दोघांनाही शुक्रवारी रात्री बेडया ठोकण्यात आल्या आहेत. दोघांकड़ून जवानांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले असून, अधिक तपास सुरु आहेत. >पासपोर्टच्या आधारे दोन लाख केले लंपासदुकलीने पासपोर्टही ताब्यात घेतले. मात्र पैसे न आल्याने त्यांची शस्त्रक्रिया थांबली. पर्यायी त्यांना डिस्चार्ज देत ठगांनी नवी मुंबईतील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यात दोन्ही ठगांनी फोन उचलणे बंद केले. त्यामुळे त्यांनी दोघांबाबत चौकशी करताच दिल्ली ऐम्बेसीमध्ये कोणीही सदस्य नसल्याचे समजले. सौदी अरब संरक्षण खात्याकडे केलेल्या चौकशीत, त्यांच्या पासपोर्टच्या आधारे २ लाख ५ हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली.
युद्धात जखमी झालेल्या येमेनच्या ५ जवानांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:17 AM