वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बेस्टला फटका, वर्षभरात ६९० लाख प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:17 AM2018-05-01T05:17:41+5:302018-05-01T05:17:41+5:30

बेस्टमधील अधिका-यांचा मनमानी कारभार, अयोग्य निविदा प्रक्रिया यामुळे ११ महिन्यांच्या काळात तब्बल ६९० लाख प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.

Better hit by the arbitrariness of senior officials, less than 690 million passengers a year | वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बेस्टला फटका, वर्षभरात ६९० लाख प्रवाशांची पाठ

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बेस्टला फटका, वर्षभरात ६९० लाख प्रवाशांची पाठ

Next

मुंबई : बेस्टमधील अधिका-यांचा मनमानी कारभार, अयोग्य निविदा प्रक्रिया यामुळे ११ महिन्यांच्या काळात तब्बल ६९० लाख प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्टमधून एकेकाळी ५० लाख प्रवासी रोज प्रवास करत होते. मात्र, सध्या सुमारे २८ लाख प्रवाशांची वाहतूक होते. बेस्टच्या ई-टिकिटिंग निविदेत दिलेल्या माहितीनुसार एप्रिल-१६ ते फेब्रुवारी- १७ या काळात ९ हजार ५०० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्यात आली होती. मात्र, एप्रिल-१७ ते फेब्रुवारी-१८ या काळात केवळ ८७१० दशलक्ष प्रवासी वाहतूक करण्यात आली. परिणामी, वर्षभरात सुमारे ६९० लाख प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते.
बेस्टच्या तोट्याला बेस्टची निर्णय क्षमता असणाºया अधिकाºयांसह पालिकादेखील तितकीच जबाबदार आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्टच्या निविदा प्रक्रिया आणि योग्य-अयोग्य निर्णयावर वचक ठेवणे बंधनकारक होते, मात्र महापालिकेने ते केले नाही. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता नसलेल्या अधिकारी आणि महापालिकेच्या अकर्तव्यक्षम कारभारामुळे लाखो प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवली.

Web Title: Better hit by the arbitrariness of senior officials, less than 690 million passengers a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.