बेटिंगचे ‘अॅप’ सापडले, आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:29 AM2017-09-03T03:29:28+5:302017-09-03T03:29:36+5:30
भारत आणि श्रीलंकेमध्ये होणा-या वन डे मॅचमध्ये बेटिंगप्रकरणी, आणखी तिघांच्या मुसक्या आवळण्यात शुक्रवारी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडे बेटिंगचे एक विशिष्ट अॅप होते.
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणा-या वन डे मॅचमध्ये बेटिंगप्रकरणी, आणखी तिघांच्या मुसक्या आवळण्यात शुक्रवारी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडे बेटिंगचे एक विशिष्ट अॅप होते. ते अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मास्टरमाइंड दीपक कपूरला विकल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई क्राइम ब्रांचच्या कक्ष नऊने केली असून, अटक आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
नीतेश खेमलानी (३०), निखिल गनत्रा (४६) आणि आनंद शर्मा (४०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांना ठाणे, बोरीवली आणि अंबोली परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील खेमलानी हा टोळीचा मुख्य सूत्रधार कपूरचा साथीदार आहे. तर गनत्राने एक ‘बेटिंग अॅप’ कपूरला विकले होते, जे त्याला शर्माने पुरविल्याची माहिती तपास अधिकाºयांना मिळाली आहे. गेल्या शुक्रवारी दीपक कपूर, तरुण ठाकूर आणि त्याचा चुलत भाऊ सनी यांना, अंधेरीच्या डी. एन. नगरमधील आॅफिसमधून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे मिळालेले १३ मोबाइल आणि दोन लॅपटॉप क्राइम ब्रांच अधिकाºयांनी ताब्यात घेतले. सीडीआरच्या मदतीने माहिती हाती लागताच खेमलानी, गनत्रा आणि शर्मा यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या तिघांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. जेणेकरून, त्यांच्या दुबईसह अहमदाबाद, तसेच
दिल्ली कनेक्शनची माहिती पोलिसांना मिळू शकेल.
कपूर स्वत:ला रिअल इस्टेट एजंट असल्याचे सांगत बेटिंगचा धंदा करत असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बेटिंगप्रकरणी अटक आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
अधिक तपास सुरू
भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाºया वन डे मॅचमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी क्राइम ब्रांचच्या कक्ष नऊने तपासाअंती आतापर्यंत ९ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी आणखीही काही जण हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.