Join us

सावध व्हा! समुद्राने फेकला तब्बल 188 मेट्रिक टन कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 9:03 PM

दरवर्षी पाऊस पडला की मुंबई तुंबण्याचा आपण सारेच अनुभव घेतो. मात्र, यानंतर वर्षभरात समुद्रात किती कचरा फेकला जातो याचा विचार करत नाही.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि आज दुपारी समुद्राला आलेले उधाण यामुळे मुंबईची लोकलसेवा ठप्प झाली होती. मात्र, समुद्राने आजच्या दिवसभरात पुन्हा जमिनीवर फेकलेला कचऱ्याचा आकडा पाहून डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे. 

दरवर्षी पाऊस पडला की मुंबई तुंबण्याचा आपण सारेच अनुभव घेतो. मात्र, यानंतर वर्षभरात समुद्रात किती कचरा फेकला जातो याचा विचार करत नाही. राज्य सरकारने प्लॅस्टीकच्या वापरावर बंदी लादली आहे. यामुळे काही प्रमाणात प्लास्टिकच्या वापरावर आळा बसला असला तरीही अद्याप कमी झालेले नाही. 

आज समुद्रामध्ये भरती होती. यामुळे उधाण आले होते. या उधाणाद्वारे समुद्रातून तब्बल 188 मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर फेकला गेला आहे. आज समुद्राला 4.90 मी. भरती आली होती. यामुळे मोठ्या लाटा उसळत होत्या. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरून सर्वाधिक वर्सोवा -जुहू 110 मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. 

मरिन लाईन किनाऱ्यावरून 15 मॅट्रिक टन, गिरगांव चौपाटी 5 मेट्रिक टन, दादर- माहीम 50 मेट्रिक टन, वर्सोवा जुहू 110 मेट्रिक टन, गोराई 8 मेट्रिक टन एवढा प्रचंड कचरा उचलण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबईकचरा प्रश्न