मुलांनो सावधान! वय १८च्या आधी गाडी चालवाल तर होणार कारवाई! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:01 AM2024-01-29T10:01:27+5:302024-01-29T10:03:56+5:30

मुंबईत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अनेक अल्पवयीन मुले-मुली दुचाकी सुसाट पळवत असल्याचे पाहायला मिळते.

Beware children action will be taken if you drive before the age of 18 in mumbai | मुलांनो सावधान! वय १८च्या आधी गाडी चालवाल तर होणार कारवाई! 

मुलांनो सावधान! वय १८च्या आधी गाडी चालवाल तर होणार कारवाई! 

मुंबई : १८ वर्षांखालील मुले-मुली ५० सीसीहून जास्त क्षमतेची दुचाकी चालवताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड व २५ वर्षांचे होईपर्यंत वाहन परवाना देऊ नका, असा आदेश परिवहन आयुक्तांनी दिला आहे. मात्र, या प्रकरणात मुंबईत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अनेक अल्पवयीन मुले-मुली दुचाकी सुसाट पळवत असल्याचे पाहायला मिळते.

शहरात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण कमी होत आहे. जे अपघात होत आहेत, त्यामध्ये  हेल्मेट न घातल्यामुळे व डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबवून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे.

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक नकोच :

पाल्यांना क्लासेसला सोडण्यासाठी अनेक पालकांना नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त वेळ मिळत नाही. स्कूटी वा अन्य वाहने खरेदी करून पाल्यांना दिली जातात. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी चालविण्यास देऊ नये. 

विद्यार्थ्यांची शक्कल :

अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींचा संख्या जास्त असल्याचे दिसून येते. क्लासला जाण्यासाठीही ते वाहनांचा वापर करतात. महाविद्यालयाच्या आवारात हे अल्पवयीन विद्यार्थी ट्रीपल सीट जातानाही दिसून येतात.

कारवाईची  गती वाढविणे आवश्यक :

  अल्पवयीन मुलाने वाहन चालविण्यास २५ हजार रुपयांचा दंड व २५ वर्षांपर्यंत लायसन्स देण्यापासून प्रतिबंध करण्याचे, पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना आहेत.

   शहरात अनेक पालक अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनाची चावी देऊन मोकळे होतात. या संदर्भात ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसते.

  हेल्मेटचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. हेल्मेटविषयी चालकांचे समुपदेशन व हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी तसेच पालकांचेही समुपदेशन करणे आवश्यक आहे.

Web Title: Beware children action will be taken if you drive before the age of 18 in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.