लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत वीज चोरांविरुद्ध सतत कारवाई सुरू असून, वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲक्शन मोडवर येत वीज कंपन्या मोहीम हाती घेत आहेत. मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसविणे, कपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.
वीज चोरीमुळे तूट वाढतेमहावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीज चोरीमुळे तूट वाढते.
दंडात्मक कारवाईवीज कायदा २००३ च्या कलम १३५ (वीज चोरी) अन्वये गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणामध्ये कालावधी निश्चित करून चोरी झालेल्या विजेचे बिल आणि वीजभारानुसार दंडाच्या आकाराचे बिल ग्राहकाला दिले जाते. थकबाकीदराने शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतली असेल दंडात्मक कारवाई केली जाते.
पायाभूत सुविधांवर भारn काही झोपडपट्ट्यांमध्ये वीज मागणी यापूर्वीच अधिक असून आणि नवीन जाळे विणले जात आहे.n जागेच्या अडथळ्यांमुळे काही आवश्यक भागात विकास शक्य होत नाही.n वीज चोरी ओव्हरलोड नेटवर्क केबल आणि ट्रान्सफॉर्मर अधिक असल्याने सेवा व देखभालीचा खर्च वाढतो.
दक्षता पथकाने गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२२ दरम्यान ११,९८९ सामूहिक छापे टाकले. ५७१ तक्रारी दाखल केल्या. ६,८१४ अनियमितता प्रकरणे नोंदविली. या संबंधातील नुकसान लक्षणीयरीत्या कमी केले.- अदाणी इलेक्ट्रिसिटी
थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास ग्राहक व त्यांना वीज पुरविणाऱ्यांवर कारवाई होते. - महावितरण
का होते हानी ?अनधिकृत वीजपुरवठा किंवा वीज वाहिन्यावर असलेले आकडे, विजेची चोरी, अयोग्य मीटरिंग, मीटर रीडिंगमधील त्रुटी, गुणक अवयव चुकीचे असणे, वीज बिलांमधील समस्या.