वीज चोराल तर खबरदार...

By admin | Published: June 2, 2017 06:07 AM2017-06-02T06:07:46+5:302017-06-02T06:07:46+5:30

शीळ व मुंब्रा येथील काही ग्राहकांद्वारे अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीज जोडणीमुळे वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे

Beware if electricity thrips ... | वीज चोराल तर खबरदार...

वीज चोराल तर खबरदार...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शीळ व मुंब्रा येथील काही ग्राहकांद्वारे अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीज जोडणीमुळे वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनधिकृत जोडणीमुळे उच्चदाब वाहिनी अतिभारीत (ओव्हरलोड) होऊन बंद होते. वीज वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने फिडर ट्रीप होतात. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या भागातील नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. परिणामी, अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
येणारा पावसाळा व रमज़ान महिना यांच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा व शीळ उपविभागातील सर्व उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेतली आहेत. पावसाळा व रमज़ान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. ठाणे मंडलातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर एक जबाबदार अभियंता सायंकाळी ६ ते रात्री १२पर्यंत भारतगिअर कार्यालयातील विशेष कक्षातून लक्ष ठेवणार आहे. तसेच उच्चदाब वाहिनीतील होणारा बिघाड त्वरित दुरुस्त करण्यास आठ कामगारांचे पथक करण्यात आले आहे.

उच्चदाब वाहिनी अतिभारीत (ओव्हरलोड) होऊ नये म्हणून ग्राहकांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विजेचा जपून व आवश्यकतेनुसार वापर करावा.
वीजचोरीवर लक्ष ठेवण्यास महावितरणाने भरारी पथकांची नेमणूक केली असून, हे पथक संशयित परिसरावर लक्ष ठेवणार आहे.

जर कोणी अनधिकृत वीज जोडणी घेत असेल किंवा पावसाळ्यात कोणती दुर्घटना होणाची शक्यता असल्यास/ झाल्यास त्याबाबतची माहिती द्यावी.
मुख्य अभियंता, भांडुप नागरी परिमंडळ (०२२-२५६६०६५२), अधीक्षक अभियंता, ठाणे मंडळ (०२२-२५८३२८९१) व भारतगिअर कक्ष (७५०६६५८०४४) यांना प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे कळवावे.

Web Title: Beware if electricity thrips ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.