Join us

प्रलोभने दाखवाल तर खबरदार

By admin | Published: February 18, 2017 6:53 AM

मुंबई महापालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मतदारांवर प्रलोभन

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर कडक कारवाई करण्यात यावी.  तसेच मतदारांवर प्रलोभन व दबाव टाकला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर अपंग व वृद्धांसाठी मतपत्रिका ही ठळक अक्षरात छापण्यात आली असून याची माहिती संबंधितांना द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.मुंबई महापालिका निवडणूकपूर्व अंतिम तयारी कामांचा राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया व राज्य निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेले मुख्य निवडणूक निरीक्षक यू.पी.एस. मदान यांनी परळच्या के.ई.एम. रुग्णालयातील जीवराज मेहता सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. जे.एस. सहारिया यांनी प्रारंभी संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडून निवडणूकपूर्व तयारी कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मतदान व मतमोजणीच्या काळात सर्वांना समान संधी देणे तसेच वागणूक ही सर्वांना समान द्यावी. मतदान व मतमोजणीची सर्व माहिती ही संगणकाद्वारेच उपलब्ध व्हावी तसेच ही माहिती द्यायला उशीर होणार नाही याची योग्य ती खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी. (प्रतिनिधी)जे.एस. सहारिया यांच्या सूचनाच्नवीन मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे प्रशिक्षण द्यायची आवश्यकता असेल तर ते तातडीने द्यावे.च्उमेदवारांकडून खर्चाचा हिशोब योग्य रीतीने मिळावा यासाठी समन्वय साधा.च्निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आपल्या सर्व निवडणूक यंत्रणेवर नजर ठेवून आहेत. यादृष्टीने आपले काम असले पाहिजे याची खबरदारी घेत निवडणूक शांततेत व चांगल्या रीतीने पार पाडा.अतिरिक्त पोलीस ताफापोलीस विभागाच्या वतीने विभागनिहाय बंदोबस्ताबाबत बैठकी घेण्यात आल्या असून चुरशीच्या लढती तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस ताफा तैनात ठेवला आहे. ३५ हजार पोलीस, २ हजार होमगार्ड व एसआरपीच्या १४ कंपनी तैनात केल्या जाणार आहेत.- देवेन भारती, सह पोलीस आयुक्तदबावाला बळी पडू नकाआपल्या विश्वासाला व प्रतिमेला धक्का न लागता आपण सर्वांनी काम केले पाहिजे. सर्व यंत्रणांच्या योग्य त्या समन्वयातून चांगल्या प्रकारे काम कसे पूर्ण करता येईल याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे सर्वांनी काम करावे.- यू.पी.एस. मदान, मुख्य निवडणूक निरीक्षकमतदानासाठी बाहेर पडामहापालिकेच्या वतीने निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून, आवश्यक त्या ठिकाणी सर्व निवडणूक साहित्य पोहोचविण्यात आले आहे. मतदारांना मतदानाची चिठ्ठी वाटप करण्याचे काम पूर्णत्वास आले असून, ज्या कोणाला चिठ्ठी मिळाली नसेल त्यांनी संबंधित महापालिका विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपली चिठ्ठी प्राप्त करावी. त्याचप्रमाणे नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावे.- अजय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिकामतदार जनजागृतीच्मतदार जनजागृतीबाबत खुली चित्रकला, घोषवाक्ये स्पर्धेतील निवडक चित्रे व घोषवाक्यांचे प्रदर्शन १८ व १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील भाटिया उद्यानाशेजारील सुलभ शौचालयाजवळ व चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर (फलाट क्रमांक ४) मोकळ्या जागेत भरविण्यात येणार आहे.सुट्टी अथवा दोन तासांची सवलत सार्वत्रिक निवडणुकांकरिता त्या क्षेत्रातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनाम्ांध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी अथवा दोन तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे.