Join us

विसर्जन मिरवणूक काढताना काळजी घ्या!; महापालिकेचे गणेश मंडळांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:35 AM

धोकादायक बनलेल्या रेल्वे पुलांवर गर्दी करू नका

मुंबई : गणेश विसर्जन मिरवणूक जुन्या रेल्वे पुलावरून काढताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.‘मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व गणेशभक्तांना आणि गणेशमंडळांना सूचित करण्यात येते आहे की, रेल्वेवरील पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरूपाचे झाले आहेत. परिणामी, सर्व गणेशभक्तांनी हे पूल गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी पार करताना काळजी घ्यावी,’ असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, पुलावरून विसर्जनावेळी जाताना गटागटाने जावे. जेणेकरून पुलावर एकाचवेळी १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही. पुलावर ध्वनिक्षेपकाचा वापर करून नाचगाणी करण्यात येऊ नयेत. उत्सवाचा आनंद पुलावरून खाली आल्यावर घ्यावा. पुलावर जास्त वेळ थांबू नये. पुलावरून त्वरित पुढे जावे. पोलीस, मनपा यांनी दिलेल्या सूचनेनेनुसार ये-जा ठेवावी.विशेष सूचना चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि करी रोड रेल ओव्हर ब्रिज ओलांडताना सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.

पुलांची नावे : मध्य रेल्वे

  • घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
  • करी रोड रेल ओव्हर ब्रिज
  • आर्थर रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज
  • भायखळा रेल ओव्हर ब्रिज

पुलांची नावे : पश्चिम रेल्वे

  • मरिन लाइन्स रेल ओव्हर ब्रिज
  • ग्रॅण्ट रोड रेल ओव्हर ब्रिज
  • सॅण्डहर्स्ट रेल ओव्हर ब्रिज
  • फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज
  • केनडी रेल ओव्हर ब्रिज
  • फॉकलँड रेल ओव्हर ब्रिज
  • बेलासीस ब्रिज
  • महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज
  • प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रिज
  • दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज
  • वीर सावरकर रेल ओव्हर ब्रिज (गोरेगाव)
  • सुधीर फडके रेल ओव्हर ब्रिज
  • दहिसर रेल ओव्हर ब्रिज
  • मिलन रेल ओव्हर ब्रिज
  • विलेपार्ले रेल ओव्हर ब्रिज
  • गोखले रोड ओव्हर ब्रिज
टॅग्स :गणेश मंडळ 2019