मुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:31 PM2018-04-20T17:31:03+5:302018-04-20T17:31:03+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीने नालेसफाईच्या कामांबाबत सावधानता बाळगावी असा गर्भित इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला
मुंबई - महापालिकेच्या स्थायी समितीने नालेसफाईच्या कामांबाबत सावधानता बाळगावी असा गर्भित इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला. आज आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्वे प्रशासनासोबत दोन वेळा बैठक घेत्यानंतर तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्या पाहणीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्या स्थायी समितीने नालेसफाईच्या कामांबाबत सावधानता बाळगावी असा गर्भित इशारा दिला.
या बैठकीत मुंबईतील रेल्वे हद्दीतून क्रॉस जाणा-या 43 नाल्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच अपुर्ण् कामांची संयुक्त पाहणी करण्याचेही निश्चित करण्यात आले. त्यानंतर 18 एप्रिला 2018 ला पुन्हा पाठपुरवा करणारी बैठक आशिष शेलार यांनी घेतली.
काय केल्या भाजपाने सूचना
- गझदर बांध पंपिंग स्टेशन तातडीने सुरू करा
- गझदर बांध पंपिग स्टेशनचा कंत्राटदार काम करीत नसतेल तर त्याला काळया यादीत टाका
- आवश्यक असेल तर नवा कंत्राटदार नियुक्त करून कामाला वेग द्या
- अथवा पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मातीचे बंधारे हटविण्यात यावेत
- वजन काटयाबाबत पारदर्शकता मुंबईकर जनतेसमोर आणा.
- नालेसफाईच्या कामाची माहिती आठवडयाला प्रसिध्द करा
- जो कंत्राटदार काम करतो आहे त्या कंत्राटदाराचे नाव आणि त्याचा नंबर त्या त्या ठिकाणी नाल्यावर प्रदर्शित करण्यात यावे
- ज्या डंम्पिंग ग्राऊडवर गाळ टाकला जात आहे त्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रिकरण करा