सावधान मुंबईकरांनो, तुमचा सिलिंडर गळका तर नाही ना? उन्हाळ्यात जास्त धोका, अशी काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:38 IST2025-04-11T13:37:44+5:302025-04-11T13:38:24+5:30

दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असतानाच आगीच्या घटनाही वाढत आहेत. अशावेळी घरगुती गॅस सिलिंडरची काळजी घेणे आवश्यक आहे

Beware of leaking cylinder how to check cylinder here are tips | सावधान मुंबईकरांनो, तुमचा सिलिंडर गळका तर नाही ना? उन्हाळ्यात जास्त धोका, अशी काळजी घ्या

सावधान मुंबईकरांनो, तुमचा सिलिंडर गळका तर नाही ना? उन्हाळ्यात जास्त धोका, अशी काळजी घ्या

मुंबई

दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असतानाच आगीच्या घटनाही वाढत आहेत. अशावेळी घरगुती गॅस सिलिंडरची काळजी घेणे आवश्यक आहे. सिलिंडर जास्त गरम होऊ देऊ नका, कारण गॅसची गळती होऊन स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकार सांगतात. 

सिलिंडर स्फोटाच्या घटना
१. मार्च २०२५- धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनात सिलिंडरची गळती होऊन आग लागली. त्यात १० ते १२ सिलिंडरची गळती झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

२. फेब्रुवारी २०२५- जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागली होती. त्यात अंदाजे १० ते १२ सिलिंडरचे एकामागे एक स्फोट झाले होते. ही आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलास तारेवरची कसरत करावी लागली होती. 

अग्निशमन दलाशी संपर्क साधा
घरगुती गॅस सिलिंडर वाहनातून कंपनीतून डिलरकडे पोहोचवले जातात. त्यानंतर त्याची छोटे टेम्पो किंवा सायकलद्वारे घरोघरी डिलिव्हरी केली जाते.

या सगळ्या प्रवासात सिलिंडरची गळती होऊन आग लागण्याची भीती असते. सिलिंडरची गळती होत असल्यास तातडीने त्याची माहिती अग्निशमन दलाला द्या. 

अग्निशमन जवान घरी पोहोचेपर्यंत देखील सुरक्षिततेसाठी काळजी घ्यायला हवी, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

उन्हाळ्यात सिलिंडरची काळजी कशी घ्यावी?
सुरक्षित ठिकाणी ठेवा- गॅस सिलिंडर सुरक्षित ठिकाणी ठेवा. तो थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या स्रोताजवळ ठेवू नका. 

गळती तपासा- नियमितपणे गॅस पाइप आणि रेग्युलेटरची तपासणी करा. गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास येताच लगेच सिलिंडर बंद करुन खिडक्या उघडा. 

सिलिंडर सरळ ठेवा: सिलिंडर नेहमी सरळ उभा ठेवा, तो कधीही उलटा करू नका. 

रेग्युलेटर योग्यरित्या बसवा: सिलिंडर रेग्युलेटर व्यवस्थित बसवलेला असल्याची खात्री करुन घ्या. 

खिडक्या उघड्या ठेवा: स्वयंपाकघरात गॅस वापरताना, वायुविजन होण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. 

गॅसची शेगडी उंच ठिकाणी ठेवा: गॅसची शेगडी सिलिंडरपेक्षा उंच ठिकाणी आगीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: Beware of leaking cylinder how to check cylinder here are tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.