Join us

ऑनलाइन बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांपासून सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 2:08 AM

सायबर भामट्यांकडून हा प्रकार सुरू असून अशा बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

मुंबई : भारतीय पासपोर्ट template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळया बाजारात दोन ते अडीच हजार रुपयांत उपलब्ध आहेत. सायबर भामट्यांकडून हा प्रकार सुरू असून अशा बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.सायबर भामटे हे अशा template  विकत घेतात व त्याला अद्ययावत करून बनावट पासपोर्ट बनवतात. त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिमकार्ड ही आॅनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत. त्यामुळे आपला पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. त्याच्या स्कॅन कॉपीना पासवर्ड देऊन सुरक्षित करा. जेथे पासपोर्टची प्रत देणार असाल तर त्या प्रतीवर निळ्या पेनाच्या शाईने सही व त्या दिवशीची तारीख नमूद करा. कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरित तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.>असा ओळखावा खरा पासपोर्टपासपोर्टच्या जारी केलेल्या तारखेत आणि अंतिम तारखेत १० वर्षांचा फरक असला पाहिजे. पासपोर्टला ३६ किंवा ६० पाने असणे गरजेचे आहे. फॉन्टचा आकार आणि alignment एकसारखी असली पाहिजे. पासपोर्टवरील भारताचा अशोक स्तंभ नीट तपासून बघा. पासपोर्टच्या शेवटच्या पानावरही पासपोर्ट क्रमांक perforated स्वरूपात असला पाहिजे. जुना पासपोर्ट असल्यास त्यावर आईवडिलांचे व जोडीदाराचे नाव हे नवीन व जुन्या पासपोर्टवर एकच असले पाहिजे. जर पासपोर्ट ३६ पानी असेल तर क्रमांक ३ ते ३४ वर भारताचा अशोक स्तंभ असला पाहिजे.

टॅग्स :पासपोर्ट