सावधान! तुमच्या मसाला दुधात असेल नकली केशर; ओरिजनल केशर कसे ओळखाल?

By प्रशांत तेलवाडकर | Published: October 8, 2022 09:03 AM2022-10-08T09:03:43+5:302022-10-08T09:03:52+5:30

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सर्वत्र सुगंधित मसाला दूध सेवन केले जाते. मात्र, या मसाला दुधातील केशर बनावट असू शकते.

beware your masala milk will contain fake saffron how to recognize original | सावधान! तुमच्या मसाला दुधात असेल नकली केशर; ओरिजनल केशर कसे ओळखाल?

सावधान! तुमच्या मसाला दुधात असेल नकली केशर; ओरिजनल केशर कसे ओळखाल?

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर, लोकमत न्यूज नेटवर्क   

औरंगाबाद: कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सर्वत्र सुगंधित मसाला दूध सेवन केले जाते. मात्र, या मसाला दुधातील केशर बनावट असू शकते. कारण नकली केशरने बाजारपेठेत शिरकाव केला आहे. 

कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरात नामांकित कंपन्यांचे तब्बल ५ किलो केशर विक्रीला आले आहे. आजघडीला ३ लाख ५० हजार रुपये प्रति किलो दराने केशर विकले जात आहे. २०२१ मध्ये केशरचे भाव सर्वांत कमी १ लाख ७५ हजार रुपये किलोपर्यंत खाली उतरले होते. मात्र, मागील वर्षभरात केशर दुपटीने महागले आहे. साधारणत: ग्राहक १ ग्रॅम केशर खरेदी करतो. ही केशरची डबी ३५० रुपयांत येते.     

दिल्लीहून मोठ्या प्रमाणात नकली केशरही बाजारात आले आहे. यात ओरिजनल केशरचे काही तंतू असतात व  बाकीचे मक्याच्या कणसाचे तंतू मिसळलेले असतात. कोणाला संशय येऊ नाही म्हणून ओरिजनल केशरच्या किमतीतच हे नकली केशर विकले जाते. यामुळे केशर खरेदी करताना ओळखीच्या दुकानदाराकडून व नामांकित कंपन्यांचे केशर खरेदी करा,  असा सल्ला केशर वितरक विलास साहुजी यांनी दिला आहे.  

कसे ओळखाल केशर?

- असली केशर - दुधात केशरचे तंतू लांब होतात. तुटत नाही. दुधात टाकल्यावर केशर हळूहळू रंग सोडतो. सुगंध येतो.  सोनेरी रंग दुधात पसरतो. विरघळत नाही, लवचिक बनतो.

- नकली केशर - दुधात टाकताच तंतू तुटतात. एकदम रंग सोडतो. सुगंध येत नाही. पिवळा किंवा लाल रंग पसरतो.  विरघळून जातो.

कशापासून बनवितात नकली केशर ?  

नकली केशर मक्याच्या कणसाच्या तंतूंपासून बनविले जाते. त्यास खाण्याचा लाल रंग लावला जातो, तसेच साखरही टाकली जाते. यामुळे तंतू केशरसारखे लाल दिसतात. यामुळे खरे आहेत की बनावट हे ओळखणे कठीण जाते.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: beware your masala milk will contain fake saffron how to recognize original

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.