Kirit somaiya VIDEO: "भाग सोमय्या भाग!", किरीट सोमय्यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून ग्राफीटी; पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:51 AM2022-04-12T11:51:15+5:302022-04-12T11:51:53+5:30

भाजपा नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यात मुंबईतील किरीट सोमय्या यांच्या निवासी कार्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर "भाग सोमय्या भाग" अशी वाक्य अज्ञात व्यक्तींनी लिहिली आहेत.

Bhaag Somaiya Bhaag Graffiti outside Kirit Somaiyas house Search by police continues | Kirit somaiya VIDEO: "भाग सोमय्या भाग!", किरीट सोमय्यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून ग्राफीटी; पोलिसांकडून शोध सुरू

Kirit somaiya VIDEO: "भाग सोमय्या भाग!", किरीट सोमय्यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून ग्राफीटी; पोलिसांकडून शोध सुरू

googlenewsNext

मुंबई

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या kirit somaiya हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यात मुंबईतील किरीट सोमय्या यांच्या निवासी कार्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर "भाग सोमय्या भाग" अशी वाक्य अज्ञात व्यक्तींनी लिहिली आहेत. रात्रीच्या वेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर घेऊन काही अज्ञातांनी ही वाक्य लिहिली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पोलिसांनी ही वाक्य पेन्टच्या सहाय्यानं खोडण्याचा प्रयत्न देखील केला आहे. दरम्यान हे कृत्य नेमकं कोणी केलय याचा शोध सध्या सुरू आहे.

सोमय्या पिता पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मात्र सोमय्यांचा ठावठिकाणा राज्याच्या गृह विभागाला माहीत नाही. तशी माहिती गृह विभागानं स्वत:चं दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा ठावठिकाणा माहिती नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही. सध्या पोलीस सोमय्या पिता पुत्रांचा शोध घेत आहेत. 

संजय राऊत काय म्हणाले?
एकीकडे गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा माहीत नसताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचं लोकेशन सांगितलं आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Bhaag Somaiya Bhaag Graffiti outside Kirit Somaiyas house Search by police continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.