Bhagat Singh Koshyari controversial statement मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातील कारकीर्द सुरूवातीपासूनच वादग्रस्त स्वरूपाची आहे. सुरूवातीला राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतभेदाच्या बातम्या चांगल्याच गाजल्या. त्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपालांनी (Governor of Maharashtra) सरकारबाबत विधान न करता मुंबई, ठाण्याबाबत विधान करत वाद ओढवून घेतला आहे. 'कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही', असं वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं. त्या विधानावरून विविध स्तरातून टीका होत आहे.
राज्यपालांच्या या विधानाविरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी राज्यपालांचा निषेध करण्यात येत आहे. याच दरम्यान मलबार हिल युवसेनेकडूनही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारने राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली. यावेळी दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, युवासेना अधिकारी हेमंत अरुण दुधवडकर यांच्यासह पदाधिकारी आणि युवसैनिक उपस्थित होते.
कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राचं मीठ गेली तीन वर्षं खाताय, त्या मिठाशी नमक हरामी केलीये. नवहिंदुत्ववादी आहेत, कडवे हिंदू असतील मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, त्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलंय. ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा असतील त्या सरकारने राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.