मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५२ व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता गेट वे आॅफ इंडिया येथे ‘स्वतंत्रते भगवती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी सावरकरांची गीते सादर केली जातील. तिथे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनहीहोणार असून, कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाºया या कार्यक्रमात देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्यावीर जवानांना अभिवादन करण्यात येणार आहे, तसेच वीर नारी, वीर माता, वीर पिता यांचा गौरवही करण्यात यईल.या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सकाळी ८.३० ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, शिवाजी मंदिर, व रवींद्र नाट्य मंदिरात मिळू शकतील.सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, जसपिंदर नरुला व डॉ. भरत बलवल्ली या वेळी सावरकरांची गीते सादर करतील. भरत बलवल्ली यांनीच कार्यक्रमाचे आयोजन केले असून, तो राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची साह्याने होत आहे. त्यात वीर सेनानी फाउंडेशन व सावरकर स्मारक यांचाही सहभाग आहे.या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ला, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपाचे खा. विनय सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी गेटवे येथे ‘स्वतंत्रते भगवती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:04 AM