भगवान आंधळे मुंबई उपनगरचे नवीन कामगार उपायुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:05 AM2021-08-12T04:05:29+5:302021-08-12T04:05:29+5:30
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे नवीन कामगार उपायुक्त म्हणून नुकताच भगवान आंधळे यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी ते रायगड येथे ...
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे नवीन कामगार उपायुक्त म्हणून नुकताच भगवान आंधळे यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी ते रायगड येथे सहायक कामगार अधिकारी होते. त्यांना जुलै २०२१ मध्ये पदोन्नती देण्यात आली.
भगवान आंधळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९५ मध्ये सरकारी कामगार अधिकारी पदावर निवड झाली. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडीचे आहेत. अहमदनगरमध्येच ते सरकारी सेेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नाशिक येथे सरकारी कामगार अधिकारी म्हणून काम केले. २००८ मध्ये सहायक कामगार आयुक्त पदावर त्यांना बढती मिळाली. त्याचवेळी बदली होऊन ते मुंबईच्या कामगार आयुक्त कार्यालयात आले.
सहायक कामगार आयुक्त म्हणून त्यांनी मुंबईसह नाशिक, पुणे, रायगड येथे काम केले. नाशिक येथे असताना लासलगाव असंरक्षित माथाडी कामगार मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्याच दरम्यान, मुंबई आणि नाशिकमध्ये त्यांनी उपनिबंधक पदाचे कामकाज पाहिले. जुलै २०२१ मध्ये त्यांना कामगार उपायुक्त या पदावर बढती मिळाली आणि त्यांनी रायगडमधून मुंबईत येऊन पदभार स्वीकारला.