ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भगवती रुग्णालयातून सहा रुग्णांना हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:05 AM2021-05-01T04:05:47+5:302021-05-01T04:05:47+5:30
दहिसर काेविड सेंटरमध्ये केली व्यवस्था; दुपारनंतर पुरवठा सुरळीत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिकेच्या बोरिवली पश्चिमेतील भगवती रुग्णालयात ऑक्सिजनची ...
दहिसर काेविड सेंटरमध्ये केली व्यवस्था; दुपारनंतर पुरवठा सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या बोरिवली पश्चिमेतील भगवती रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे शुक्रवारी दुपारी या रुग्णालयातील सहा रुग्णांना दहिसर कोविड सेंटर येथे हलविण्यात आले. रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आमच्या रुग्णांना हलविण्यात आल्याची माहिती एका रुग्णाच्या कुटुंबाने ‘लोकमत’ला दिली.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दहा दिवसांपूर्वी येथील सुमारे १७ ते १८ रुग्णांना दहिसर कोविड सेंटर येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथे ऑक्सिजनची कमतरता भासली. यासंदर्भात भगवती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. शांताराम कवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सकाळी येथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होता. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या सहा रुग्णांना आम्ही दहिसर कोविड सेंटरमध्ये हलवले. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजता तीन मोठे ऑक्सिजन सिलिंडर आल्याने इतर रुग्णांना येथून हलविण्यात आलेले नाही. आता येथील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
----