भाईंदरला मंगळवारी कमी दाबाने पाणी

By admin | Published: September 22, 2014 12:47 AM2014-09-22T00:47:36+5:302014-09-22T00:47:36+5:30

शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीकडून करण्यात येणारा ८६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवारी बंद

Bhaindar low pressure on Tuesday | भाईंदरला मंगळवारी कमी दाबाने पाणी

भाईंदरला मंगळवारी कमी दाबाने पाणी

Next

भार्इंदर : शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीकडून करण्यात येणारा ८६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवारी बंद करण्यात येणार आहे. हा पाणीपुरवठा मंगळवारी स. ९ वा.पासून ते बुधवारी स. ९ वा.पर्यंत २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
स्टेम कंपनीमार्फत खंडित पाणीपुरवठ्यादरम्यान एमआयडीसीद्वारे (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने शहराला अपुरे पाणी कमी दाबाने मिळणार आहे. शहरवासीयांनी या दरम्यानच्या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhaindar low pressure on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.