Join us

Tauktae Cyclone: भाईंदरची न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 3:38 PM

नांगराचा दोर तुटल्याने खवळलेल्या समुद्रातच बोट घेऊन आता हे मच्छीमार किनाऱ्याला येण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी दिली आहे.

मीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अद्यापही समुद्रातच अडकलेली आहे. या बोटीवर एकूण 6 जण अडकले असल्याचे समजते. वादळाच्या तडाख्यात ही बोट सापडली असून या स्थितीत मदतकार्यदेखील अशक्य होऊन बसले आहे. (Bhainder's New Help Mary fishing boat is still at sea; 6 people stuck, relief work impossible)

या बोटीवर जस्टीन मिरांडा ह्या नाखवासह 5 खलाशी, असे एकूण 6 जण आहेत. दुपारी जस्टीन यांचा वायरलेस वरून संपर्क झाला होता. त्यावेळी ते किनाऱ्यापासून 11 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 23 किमी खोल समुद्रात अडकले आहेत, असे समजले. त्यांच्या जीवाला धोका असून समुद्रातील खडकाला नांगर टाकून हे मच्छीमार जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. वादळामुळे त्यांची बोटही ओढली जात होती. ती केवळ नांगराच्या सहाय्यने तग धरून होती. 

मात्र, नांगराचा दोर तुटल्याने खवळलेल्या समुद्रातच बोट घेऊन आता हे मच्छीमार किनाऱ्याला येण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी दिली आहे.

दरम्यान, वादळाने समुद्र खवळला असून बोटीवरील 6 जण सुखरूप यावेत ह्यासाठी पाली गावातील ग्रामस्थ व मिरांडा कुटुंबीय परमेश्वराकडे सातत्याने प्रार्थना करत आहेत. 

टॅग्स :तौत्के चक्रीवादळमुंबईमच्छीमार