‘भाविक’कोंडी सुटणार ! वाहतूक पोलिसांचे प्रयत्न, ५३ मार्गांवर वाहनांना बंदी, ५४ मार्गांवर एकेरी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:56 AM2017-08-25T00:56:50+5:302017-08-25T00:59:49+5:30

मुंबई आणि उपनगरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सव कालावधीत घराबाहेर पडणा-यांची अर्थात भाविकांची कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

'Bhaktikandi' will be released! Traffic Police Attempts, Ban Vehicles on 53 Routes, Single Traffic on 54 Routes | ‘भाविक’कोंडी सुटणार ! वाहतूक पोलिसांचे प्रयत्न, ५३ मार्गांवर वाहनांना बंदी, ५४ मार्गांवर एकेरी वाहतूक

‘भाविक’कोंडी सुटणार ! वाहतूक पोलिसांचे प्रयत्न, ५३ मार्गांवर वाहनांना बंदी, ५४ मार्गांवर एकेरी वाहतूक

Next

मुंबई : मुंबई आणि उपनगरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सव कालावधीत घराबाहेर पडणाºयांची अर्थात भाविकांची कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
वाहतूक पोलिसांनी शहरातील ५३ रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तर, ५४ रस्त्यांवर केवळ एकेरी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. ९९ ठिकाणी वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
२६ आॅगस्ट (दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन), २९ आॅगस्ट (पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन), ३१ आॅगस्ट (सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन) आणि ५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) या दिवशी हे नियम लागू असतील.
वाहतुकीवरील निर्बंधांसोबतच वाहतूक पोलिसांचे ३ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी या काळात वाहतूक नियमनाचे काम करतील. त्यांच्या जोडीला ५०० ट्रॅफिक वॉर्डनही प्रवाशांच्या सेवेत असतील.

या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई
विसर्जनावेळी सकाळी ११ ते दुसºया दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत शहरातील ९९ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मलबार हिल विभागातील विसर्जन मार्गावरील ११ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दादर चौपाटी परिसरातील केळूसकर मार्ग (मुख्य, उत्तर आणि दक्षिण), चैत्यभूमी ते शिवाजी पार्क जंक्शन आणि चौपाटी परिसरात वाहने उभे करण्यास मनाई आहे.

वाहतूक व्यवस्थेतील बदल पुढीलप्रमाणे
दक्षिण मुंबई - काळबादेवी विभागातील जगन्नाथ शंकर शेठ रोड, व्ही.पी. रोड, सी.पी. टँक रोड वाहतुकीसाठी बंद असेल. तर, भायखळा विभागातील भारतमाता ते बावला कम्पाउंडपर्यंतचा पट्टा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी, चिंचपोकळी पूल ते यशवंत चौक, काळाचौकी हा मार्गही वाहतुकीसाठी बंद असेल.
वरळी विभागात डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड वरळी नाका ते हाजीअलीदरम्यान दक्षिण वाहिनी मार्ग बंद असेल. त्यामुळे डॉ. ई. मोझेस रोडवरून महालक्ष्मी रेल्वे स्थानक मार्गाकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. तर, ना.म. जोशी मार्गदेखील विशिष्ट टप्प्यावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दादर विभागातील एस.के. बोले रोडवर हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चौकपर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहील.

खास वाहतूक नियंत्रण कक्ष
वाहतुकीच्या चोख नियोजनासाठी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, वांदे्र बडा मशीद, जुहू चौपाटी आणि पवई येथे वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.

रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त फौजफाटा
गणेशोत्सव काळात रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या नियमित जवानांच्या जोडीला अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह, मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, वडाळा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त करण्यात आला आहे.
चर्चगेट स्थानकावर ५ वरिष्ठ अधिकाºयांसह ५५ कर्मचाºयांची विशेष तुकडी तैनात आहे. तर ठाणे आणि वडाळा येथे वरिष्ठ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली १० पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

Web Title: 'Bhaktikandi' will be released! Traffic Police Attempts, Ban Vehicles on 53 Routes, Single Traffic on 54 Routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.