भांडुप आग : एक रुपयाचा माल वाचला नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:06 AM2021-03-27T04:06:29+5:302021-03-27T04:06:29+5:30

येथे काहीच सुरक्षित नव्हते मॉलच्या मागील बाजूस ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी पोलिसांना, अग्निशमन दलाला मोठी ...

Bhandup fire: Not a single rupee worth of goods saved ... | भांडुप आग : एक रुपयाचा माल वाचला नाही...

भांडुप आग : एक रुपयाचा माल वाचला नाही...

googlenewsNext

येथे काहीच सुरक्षित नव्हते

मॉलच्या मागील बाजूस ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी पोलिसांना, अग्निशमन दलाला मोठी मदत केली. पाणी देण्यापासून चहा देण्यापर्यंत त्यांनी काम केले. मात्र आग लागलेल्या मॉलमध्ये कोणतीच गोष्ट सुरक्षित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मॉलची देखभाल दुरुस्ती होत नव्हती. आग शमविण्यासाठी जे साहित्य लागते ते साहित्य येथे पुरेशा प्रमाणात नव्हते.

मंदिराच्या मागील बाजू जळाली

मॉलच्या मागील बाजूस एक मंदिर असून, या मंदिरालादेखील आगीची झळ बसल्याचे दुकानदारांनी सांगितले. मंदिराच्या मागील बाजूचे आगीत नुकसान झाल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले.

दुपारचे ३ वाजले तरी आग शमेना

गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता लागलेली आग शुक्रवारचे दुपारचे तीन वाजले तरी शमली नसल्याचे चित्र होते. मॉलच्या मागील बाजूस ठिकठिकाणचा भाग जळत असल्याचे दर्शनी परिसरातून दिसत होते.

एक वडापाव, अग्निशमन दल आणि पोलीस

मॉलच्या मागील बाजूस आग शमविण्यासाठी काम करत असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई पोलिसांना येथील परिसरातील नागरिकांनी पोटाला थोडासा आधार म्हणून वडापाव दिला होता. शिवाय पाण्याच्या बाटल्या आणि चहाचादेखील यात समावेश होता.

उष्णतेच्या लाटा आणि आगीच्या ज्वाळा

मुंबईचे कमाल तापमान गेल्या कित्येक दिवसांपासून ३७ अंश नोंदविण्यात येत आहे. यात शुक्रवारीदेखील फारसा काही फरक निदर्शनास आला नाही. सूर्य डोक्यावर आग ओकत असतानाच मॉलमधून येणाऱ्या गरम वाफा शरीराहून घामाच्या धारा काढत होत्या.

Web Title: Bhandup fire: Not a single rupee worth of goods saved ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.