Bhandup Hospital Fire: भांडूपमधील सनराईझ रुग्णालयाच्या आगीत मृतांचा आकडा १० वर; महापौरांचे कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 11:21 AM2021-03-26T11:21:09+5:302021-03-26T11:37:57+5:30
रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे. (Death toll rises to 10 in fire at Sunrise Hospital in Dreams Mall at Bhandup West)
मुंबई: भांडूप परिसरातील सनराईझ रुग्णालयामध्ये (Sunrise hospital) आग लागल्याची घटना घडली. ड्रीम्स मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहोचला. सदर घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Death toll rises to 10 in fire at Sunrise Hospital in Dreams Mall at Bhandup West)
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे.
Brihanmumbai Municipal Corporation has ordered a probe in the Bhandup fire incident which has claimed 10 lives.
— ANI (@ANI) March 26, 2021
Mumbai Guardian Minister Aslam Shaikh confirms there were fire safety lapses at the hospital and the mall, action to be taken against those found responsible.
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री १२.३० च्या सुमारात ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली, लेव्हल ३-४ ची ही आग असल्यानं २३ अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले. तसेच आतापर्यंत ७६ रुग्णांना कोविड सेंटरला हलवण्याल आलं आहे.
भांडूप येथे सनशाईन रुग्णालयाला भीषण आग लागण्याची घटना घडली त्याप्रसंगी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला सोबत अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी वृंद@mybmc@AUThackeraypic.twitter.com/UGNxcg3siy
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 25, 2021
प्राथमिक तपासात हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करत, दोषीवर कारवाई करण्यात येईल. - हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त