भानुशाली इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:40 AM2020-07-18T05:40:33+5:302020-07-18T05:42:05+5:30
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाही दिली.
मुंबई : मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाही दिली. तसेच रहिवाशांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
पोलिसांना अहवालाची प्रतीक्षा
फोर्ट येथील भानुशाली इमारत दुर्घटनेप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत, एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित यंत्रणांकडून अहवाल प्राप्त होताच, पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरील अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच जखमींचे जबाब
नोंदविण्यात येत आहेत.