Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 10:11 AM2018-09-10T10:11:37+5:302018-09-10T11:57:38+5:30

Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे.

Bharat Bandh: Stone pelting incidents on BEST buses near Vashi naka | Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक

Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक

Next

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई शहरासह अनेक ठिकाणी आंदोलनाला समिश्र प्रतिसाद मिळत आहे, तर काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे समजते. 

चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. याशिवाय, चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेने अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने पेट्रोलपंपावर गाढव आणले आणि आंदोलन केले. दुसरीकडे, अंधेरी स्टेशनवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

(Bharat Bandh : मुंबईतील शाळा, महाविद्यालये सुरूच राहणार!)

पुण्यात बंदला हिंसक वळण, पीएमपीची बस जाळली
पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे.  या बंद दरम्यान कोथरुड डेपोमध्ये पीएमपी बस पेटवून देण्याची घटना पहाटे घडल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबतचे व्हिडीओ तातडीने व्हायरल केल्याने बंद पार्श्वभूमीवर ही बस पेटली नसून पेटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान कुमठेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता एका पीएमपी बसवर दगडफेक करुन तिच्या काचा फोडल्याचे समोर आले आहे. 

(Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे)

मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडणार 
या बंदच्या माध्यमातून, आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. ''देशात इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे, अशा वेळी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सोमवारचा ‘भारत बंद’ त्यासाठीच आहे. देशभरातील व्यापारी वर्गाने त्याला उत्स्फूर्तपणे साथ द्यावी, असे आवाहन करीत माकन म्हणाले, बंदच्या काळात कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होणार नाही, बंद शांततेत पार पडेल, याची आम्ही दक्षता घेतली आहे'', असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. 

(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; देशभरात काँग्रेसची निदर्शनं)

 

Web Title: Bharat Bandh: Stone pelting incidents on BEST buses near Vashi naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.