स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' द्यावा - उद्धव ठाकरे
By admin | Published: March 29, 2016 08:12 AM2016-03-29T08:12:55+5:302016-03-29T09:19:28+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारकडे केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारकडे केली आहे. काँग्रेसचं तोंड बंद करण्यासाठी सावरकरांना 'भारतरत्न' देण्यात यावा असे आवाहन एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेनेने सरकारला केले आहे.
महाराष्ट्रात सावरकरांकडे मोठ्या सन्मानाने पाहिले जाते, मात्र काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे सावरकर यांना तात्काळ भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित करुन काँग्रेसचे थोबाड बंद करावे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
सावरकरांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती. माफी न मागितल्यास काँग्रेस आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करू असा इशाराही भाजपातर्फे देण्यात आला. मात्र ' सावरकरांना भारतरत्न देऊन बदनामी मोहिमेचे ढोंग बंद पाडा, मग आंदोलनाची गरज पडणार नाही' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ज्यावेळी चंद्रशेखर आझाद भारतासाठी प्राणांची आहुती देत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते अशी टिपण्णी करत काँग्रसने सावरकरांवर टीका केली होती. तसेच शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेही काँग्रेसने पुन्हा सावरकरांवर टीका करत त्यांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला होता.