मुंबई-पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताच्या पंतप्रधान यांच्या विरोधात दिलेल्या अतार्किक, अवमानकारक व लज्जास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय भाजपा युवा मोर्चा (भाजयूमो) उपाध्यक्ष व आमदार राम सातपुते व भाजयूमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध व्यक्त केला. आज युवा मोर्चा मुंबईच्या तरुणांनी संपूर्ण शहरात पाकिस्तान विरोधात मोर्चा काढला.यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले.
यावेळी तिवाना म्हणाले की, दहशतवाद जोपासणारे आणि जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हा भारताचा अपमान असून तो भारतीय जनता अजिबात सहन करणार नाही. यावेळी राज्यपालांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, निवेदनाची दखल घेतल्यानंतर योग्य मंचावर हा मुद्दा उपस्थित करतील.तसेच दहशतवादी कारखाना चालवणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले त्याचा निषेध नोंदवून योग्य ती कडक कारवाई केली जाईल.
या शिष्टमंडळात मुंबई युवा मोर्चाचे सरचिटणीस कमलेश डोके, दीपक सिंह, युवा मोर्चा दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंह, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप यांचा सहभाग होता.