भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईतील ३६ विधानसभांमध्ये नवीन मतदार संमेलन
By मनोहर कुंभेजकर | Published: January 24, 2024 06:03 PM2024-01-24T18:03:44+5:302024-01-24T18:05:11+5:30
प्रत्येक ठिकाणचे १००० हून अधिक नवीन मतदार संमेलनाला उपस्थित राहून पंतप्रधानांचे भाषण ऐकतील. हे पहिल्यांदाच घडत असून पंतप्रधान एकाच वेळी ५० लाखांहून अधिक नवीन मतदारांना संबोधित करतील.
मुंबई - भारतीय जनता युवा मोर्चा देशभरात मोठ्या प्रमाणावर नवमतदार संमेलन आयोजित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १८ ते २५ वयोगटातील प्रथमच मतदार, युवक आणि युवतीनां संबोधित करतील. हा कार्यक्रम भारतभरात ५००० ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जात आहे. प्रत्येक ठिकाणचे १००० हून अधिक नवीन मतदार संमेलनाला उपस्थित राहून पंतप्रधानांचे भाषण ऐकतील. हे पहिल्यांदाच घडत असून पंतप्रधान एकाच वेळी ५० लाखांहून अधिक नवीन मतदारांना संबोधित करतील.
हा स्वतःच एक विक्रम असून याद्वारे पंतप्रधान सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देतील. भाजयुमो सर्व नवीन मतदार संमेलनामध्ये शैक्षणिक प्रदर्शनांचे आयोजन करेल अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी लोकमतला दिली.
या संमेलनात काँग्रेसच्या राजवटीत २०१४ पूर्वीचा काळ चित्रित केला जाईल आणि पंतप्रधानांनी सुरू केलेल्या परिवर्तनात्मक कार्य आणि प्रगतीवर प्रकाश टाकेल. भारताच्या समृद्धीच्या प्रवासाबाबत स्पष्ट दृष्टी असलेल्या नवीन मतदारांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.या मालिकेत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबत तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे.या सर्व ३६ संमेलनांमध्ये भाजयुमो मुंबईशी निगडित प्रत्येक कार्यकर्ता हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मनापासून काम करत आहे.या परिषदेबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे अशी माहिती त्यांनी दिली.
कॉलेज आउटरीच कार्यक्रमांतर्गत, युवा मोर्चाने मुंबईतील महाविद्यालये, कोचिंग सेंटर्स, क्रीडा केंद्रे, मुंबई विद्यापीठाला भेट देऊन या संमेलनासाठी नवीन मतदारांची नोंदणी केली आहे.अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे देखील या कार्यक्रमाचे स्क्रीनिंग करणार आहेत. बूथ, प्रभाग, विभाग, जिल्हा आणि मुंबई स्तरावरील युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहेत अशी माहिती तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली.
या कार्यक्रमात स्थानिक खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस स्वतः विल्सन कॉलेज, गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, नवदाता संमेलनाचा उद्देश नवीन मतदारांना सहभागी करून घेणे आणि त्यांची नोंदणी करणे हा आहे आणि आपल्या सजीव लोकशाहीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे. देशातील जे तरुण २०१४ मध्ये ८-९ वर्षांचे होते ते आता १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. हे मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.मागच्या काँग्रेस सरकारच्या काळात देशात झालेले घोटाळे आणि समस्यांची माहिती देण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजना आणि सर्वांगीण विकासाची माहिती देण्यासाठी ही नवीन मतदान परिषद महत्त्वाची आहे अशी माहिती त्यांनी दिली.