- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकासमंत्री
पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दरड कोसळणाऱ्या संभाव्य धोकादायक परिसरांची यादी जाहीर केली जाते. तिथे राहणाऱ्या लोकांना घरे खाली करण्याच्या नोटिसाही दिल्या जातात. मात्र, स्थलांतराची समस्या कायमस्वरूपी मिटत नसल्याने या ठिकाणचे रहिवासी नाईलाजाने धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करतात. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नवे व्यापक धोरण अमलात आणणे गरजेचे आहे.
- राहुल शेवाळे, खासदार
मध्यरात्री पावसाने रौद्ररूप धारण केले; क्षणात होत्याचे नव्हते झाले. चेंबूर भारतनगर परिसरात दरड कोसळून मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ही घटना अतिशय दुर्दैवी; मन हेलावणारी आहे.
- वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
चेंबूरमधील दुर्घटनेला जबाबदार कोण? महापालिका नेहमी ‘नैसर्गिक आपत्ती’ च्या मागे लपू शकत नाही. पालिका, राज्य सरकार केंद्र सरकार प्रत्येकाने आपापले कामे करायला हवेत. राजकारण खूप खालच्या थराला गेले आहे, लोकांना केवळ व्होटबँक म्हणून पाहिले जाते. पण त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविले जात नाहीत ते सोडविले पाहिजेत.
- भाई जगताप, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
आमचे पाच जणांचे कुटुंब आहे, मी पती आणि तीन मुले येथे राहतो. रात्री १२.३० वाजता जोरदार पाऊस आला तेव्हा आरडाओरड झाल्याचाही आवाज आला. आम्ही लगेच घरातून बाहेर पडून लांब गेलो म्हणून वाचलो.
- कौशर सय्यद, स्थानिक रहिवासी
भिंत घरावर कोसळल्याचा जेव्हा आवाज आला तेव्हाच लगेच आम्ही घरातून बाहेर पळालो. आता आमच्या घरात सगळा चिखल पसरला असून, सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.
- रंजना मानके, स्थानिक रहिवासी