भारिप-एमआयएम ही भाजपाच्या चाणक्यांनी घडवून आणलेली युती- शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 03:07 PM2018-10-03T15:07:37+5:302018-10-03T15:07:55+5:30

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या युतीवर घणाघाती टीका केली आहे.

Bharip-MIM is a coalition organized by BJP leaders- Shiv Sena | भारिप-एमआयएम ही भाजपाच्या चाणक्यांनी घडवून आणलेली युती- शिवसेना

भारिप-एमआयएम ही भाजपाच्या चाणक्यांनी घडवून आणलेली युती- शिवसेना

Next

मुंबई- शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या युतीवर घणाघाती टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी एकत्र आल्यामुळे देशाचा राजकारणावर काय प्रभाव पडेल, हे आता सांगता येणार आहे. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असले तरी त्यांच्या मागे सगळाच समाज उभा नाही. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांची युती ही बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत युती आहे. 

दलित समाज जागरूक आहे. त्यांच्यात अनेक गटतट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही अशा प्रकारची युती मान्य नव्हती, याचा त्यांना राजकीय लाभ होणार नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिस मते काँग्रेस, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मिळू नयेत म्हणून भाजपाच्या चाणक्यांनी ही युती घडवून आणली आहे. अनेक ठिकाणी दलित बांधव हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाबरोबर आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा आपल्या सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहे. अशा प्रकारची युती करून प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमबरोबर जावं हे मनाला पटत नाही. प्रकाश आंबेडकरांची स्वतःची एक भूमिका आहे. अनेकदा त्यांची पावलं योग्य दिशेनं चालली आहेत, असं वाटत असतानाच अचानक ती भरकटतात. प्रकाश आंबडेकरांनी भाजपा किंवा शिवसेनेबरोबर यायला हवे होते. एमआयएमनं कत्तल करण्याची भाषा वापरली होती. बंडाची भाषा केली होती, आंबेडकरांनी त्यांच्या घरात जावं स्वीकारार्ह नाही. 

भाजपाचे अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात
शिवसेनेला तडा जाऊ शकत नाही. भाजपाचे आमदार, खासदार सोडून जातात. आशिष देशमुखांसारखे अनेक भाजपा आमदार आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यात अनेक नामवंत नावांचा समावेश आहे. वेळ आल्यावर ही नावं उघड केली जातील. 

Web Title: Bharip-MIM is a coalition organized by BJP leaders- Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.