Join us

भास्करराव साण्डू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:06 AM

फार्मास्युटिकल्सचे अध्यक्षलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे भास्करराव गोविंद साण्डू यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने ...

फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे भास्करराव गोविंद साण्डू यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी जयश्री साण्डू व मुले शशांक सांडू, उमेश सांडू आणि डॉ. किशोर सांडू असा त्यांचा परिवार आहे. दुपारी चेंबूर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आयुर्वेदिक क्षेत्रात १२० वर्षांहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या साण्डू फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ते अध्यक्ष होते. तब्बल ६० वर्षे ते साण्डू फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत होते. तसेच गेली २० वर्षे ते या कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील गोविंदराव साण्डू यांच्या आदेशानुसार त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी कंपनीच्या विपणन विभागात कामाला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीतच कंपनीचा विस्तार देशापलीकडे अधिकाधिक वाढत गेला व कंपनीचे उत्पादन १ हजार टक्‍क्‍यांनी वाढले. त्याचप्रमाणे कर्मचारीही चारपटीने वाढले. चेंबूर येथील कार्यालय तसेच नेरुळ व गोवा येथील कारखाना त्यांच्यामुळे उभा राहिला. त्यांनी अनेक डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधांबद्दल माहिती देऊन त्यांच्यात आयुर्वेदामधील रुची निर्माण केली.

पोद्दार महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य पदवी घेतली. त्यांना सुदृढ राहण्याची आवड होती तसेच इतरांनीही सुदृढ राहण्याचा त्यांचा नेहमी आग्रह असे.

....................................