भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 12:31 PM2019-01-27T12:31:28+5:302019-01-27T12:47:47+5:30
मालाडमधील भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेला शनिवारी (26 जानेवारी) लागलेल्या आगीत आज एकाचा मृत्यू झाला झाला आहे.
मुंबई - मालाडमधील भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेला शनिवारी (26 जानेवारी) लागलेल्या आगीत आज एकाचा मृत्यू झाला झाला आहे. सुनंदा प्रभाकर कोळी यांच्या मालकीची जय गंगा मैया नौका नोंदणी क्र. एम एच-02-एम एम 5909 ही मासेमारी नौका खोल समुद्रात डोळ मासेमारीसाठी 13 जानेवारी रोजी गेली होती. गेल्या आठवडाभर उत्तरे कडून दक्षिणेला सुसाट वारा वाहत असल्यामुळे मासेमारी ठप्प होऊन मासेमारी नौका खोल समुद्रात उभ्या आहेत.
शनिवार सायंकाळी जय गंगा मैया नौकेवरील खलाशी सुरेश कुमार निषाद हे जेवण बनवित असताना नौकेतील गँस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन नौकेला आग लागली. या आगीत सात जाळ्यांसह नौका जळून राख होऊन नौका बुडाली आहे. बाजूला असलेल्या नौकांनी खलाशांना वाचविले. व त्यांना किनाऱ्यावर आणण्यात यश आले.
नौकेला लागलेल्या आगीत सुरेश कुमार निषाद जास्त प्रमाणात भाजला होता. त्याचे आज सकाळी शताब्दी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. बाकीच्या तीन खलाशांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. या बोट दुर्घटनेत सुनंदा कोळी यांचे 40 ते 45 लाखांचे नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कुटुंबियांना त्वरित अर्थिक मदत करावी असे आवाहन महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जामकर यांच्याकडे केली आहे.