Join us

भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर पालिका मंडईत सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 11:26 PM

पाणी, स्वच्छतागृह, डागडुजी, सुरक्षा रक्षकाच्या अभावामुळे चेंबूर गाव येथील व्ही. एन. पुरव मार्गावरील सर्वात जुनी भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर पालिका मंडई ही अनेक समस्यांना ग्रासल्याने ओस पडली आहे.

- शेखर साळवेमुंबई : पाणी, स्वच्छतागृह, डागडुजी, सुरक्षा रक्षकाच्या अभावामुळे चेंबूर गाव येथील व्ही. एन. पुरव मार्गावरील सर्वात जुनी भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर पालिका मंडई ही अनेक समस्यांना ग्रासल्याने ओस पडली आहे. या मंडईत सुविधांचा वनवा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मंडईभोवती अनधिकृत फेरीवाले असल्याने, या मंडईमध्ये कोणीच फिरकेनासे झाले आहे. परिणामी, भाजी गाळेधारकांनी चक्क गाळेच बंद केल्याची परिस्थिती निर्माण झाली.मंडईच्या पुनर्विकासाबाबत काही मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे विकासकामार्फत या मंडईचा पुनर्विकास करण्याबाबतचे प्रस्तावही रद्द करण्यात आले आहेत़ या मंडईचा पुनर्विकास आता पालिका स्वत: करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडईच्या पुनर्विकास योजनेच्या नावाखाली पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने, सध्या मंडईत सुविधांचा अभाव दिसत असल्याने सर्व गाळेधारक त्रासले आहेत़या मंडईतील मासे विक्रेत्यांना स्वच्छतेसाठी मंडईच्या टाक्यामधून चक्क पाणी उपसून काढावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मंडईत लावलेले नळ निकामी झाले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी स्वत:च एक पाइप आणून पाणी उपसून घेण्याची कसरत रोजच्या रोज करावी लागत आहे.