घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:38 PM2024-05-16T20:38:18+5:302024-05-16T20:39:11+5:30
Bhavesh Bhinde Arrested Ghatkopar Hoarding Collapse: उदयपूरच्या हॉटेलमध्ये भाच्याच्या नावाने रूम बूक करून राहत होता भावेश
Bhavesh Bhinde Arrested Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईत सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. घाटकोपर भागातील एक मोठे होर्डिंग कोसळून त्यात सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला. होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली दबून अनेक जण जखमी झाले. गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेबाबत राजकीय स्तरावर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना दिसले. याचदरम्यान, या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला अखेर पोलिसांनीअटक केली आहे.
Ghatkopar hoarding collapse incident | Owner Bhavesh Bhinde arrested by Mumbai Police Crime Branch. He has been arrested from Udaipur and is being brought to Mumbai.
— ANI (@ANI) May 16, 2024
(Bhavesh Bhinde in black t-shirt in pic) pic.twitter.com/TUdFNe2hFI
दोन दिवस होता फरार, कुठून केली अटक?
होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेनंतर भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उदयपूर येथून भावेश भिंडेला अटक केली. भावेश भिंडेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणले जाणार आहे. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती, तिथे तो राहत होता. मुंबई पोलिसांनी तपासात कुठलीही कसून न ठेवता त्याला अटक केली.