रेल्वे स्टेशनमधील भेळ आरोग्यास घातक

By admin | Published: January 4, 2016 02:06 AM2016-01-04T02:06:17+5:302016-01-04T02:06:17+5:30

पोलीस, रेल्वे प्रशासन व सिडकोच्या आशीर्वादाने नवी मुंबईमधील प्रत्येक स्टेशनमध्ये अनधिकृतपणे भेळविक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

Bhel health in the railway station is dangerous | रेल्वे स्टेशनमधील भेळ आरोग्यास घातक

रेल्वे स्टेशनमधील भेळ आरोग्यास घातक

Next

नवी मुंबई : पोलीस, रेल्वे प्रशासन व सिडकोच्या आशीर्वादाने नवी मुंबईमधील प्रत्येक स्टेशनमध्ये अनधिकृतपणे भेळविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. वाशीमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच या मालाची साठवणूक केली जाते. स्वच्छतेचा कोणताच निकष पाळला जात नसल्याने ही भेट आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागली आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनलमध्ये २६ /११ ला दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सर्वच रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. परंतु देशातील सर्वात भव्य रेल्वे स्थानके असणाऱ्या नवी मुंबईमध्ये मात्र सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वाशी ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्लॅॅटफॉर्मवर भेट विक्रेते व्यवसाय करीत आहेत. दोन व्यावसायिकांनी या व्यवसायाचा अनधिकृत ठेका घेतला आहे. परप्रांतीय तरुणांना रोज २०० ते ३०० रुपये किंवा विक्रीवर आधारीत पैसे देवून काम करून घेतले जात आहे. फेरीवाल्यांना प्लॅटफार्मवर परवानगी नाही. तरीही पोलिसांसह रेल्वे व सिडकोच्या अधिकाऱ्यांना खूश करून व विनंत्या करून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. भेळ विक्रेत्यांनी पूर्वी वाशी स्टेशनच्या पलीकडील मोडकळीस आलेल्या खोलीचा वापर सुरू केला होता. परंतु त्याविरोधात तक्रारी वाढू लागल्यानंतर स्टेशनच्या बाजूला तंबू ठोकून तेथे गोडाऊन करण्यात आले आहे. दिवसभर येथे विक्रेत्यांना भेळ पुरविण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे जेथे भेळ ठेवली जाते त्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. अनेकवेळा जमीनीवर पडलेले चने, कुरमुरे उचलून पुन्हा पाटील ठेवले जातात.
भेळ विक्री करणाऱ्या मुलांचे हातही स्वच्छ नसतात. ज्या ठिकाणी भेळ ठेवली जाते तेथे प्रसाधनगृह नाही. मुले उघड्यावर लघुशंकेला जातात व हात न धुता पुन्हा भेळ पाटील टाकण्याचे व कांदा चिरण्याचे काम सुरू करतात. प्रवासी मोठ्या प्रमाणात भेळ खरेदी आहेत. काही विक्रेते काही वेळा दोन पाट्या भेट संपवितात. स्वच्छतेचे कोणतेच निकष न पाळता व कोणतीच परवानगी न घेता सुरू असलेल्या या भेळविक्रेत्यांवर काहीच कारवाई होत नाही.
रेल्वे पोलीस जीआरपीकडे बोट दाखवितात. त्यांचे पोलीस ठाणे मानखुर्दला आहे. त्यांचे अधिकारी आम्ही कारवाई करीत असल्याचे सांगतात, परंतु प्रत्यक्षात मात्र मागील चार ते पाच वर्षांत एक दिवसही भेळ विक्री बंद झालेली नाही. परंतु सिडको प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Bhel health in the railway station is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.