Bhendi Bazaar : भेंडी बाजारात होत आहेत ३,२०० घरे, ४ हजार कोटी रुपये खर्च होणार; म्हाडा, सरकारचा समूह पुनर्विकास प्रकल्प
By सचिन लुंगसे | Published: December 27, 2021 06:46 AM2021-12-27T06:46:12+5:302021-12-27T07:58:33+5:30
Bhendi Bazaar : भेंडी बाजारातील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सहाव्या सेक्टरचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्याच्या आयओडी आणि सीसी प्राप्त झाल्या आहेत.
- सचिन लुंगसे
मुंबई : दक्षिण मुंबईतल्या भेंडी बाजारचा समूह पुनर्विकास राज्य सरकार, म्हाडा, सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ( क्लस्टर डेव्हल्पमेंट) हाती घेतला आहे. सुमारे ४ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून येथे उभारण्यात येणाऱ्या ११ इमारतींमध्ये तब्बल ३ हजार २०० घरांसह १ हजार २५० दुकाने बांधली जात आहेत. सद्यस्थितीत पुनर्विकासांतर्गत ६१० नव्या घरांसह १२० दुकाने बांधले गेली असून, या प्रकल्पामुळे ३ हजार २०० कुटुंबांचे नव्या घरांत पुनर्वसन होत आहे.
भेंडी बाजारातील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सहाव्या सेक्टरचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्याच्या आयओडी आणि सीसी प्राप्त झाल्या आहेत. योजनेनुसार, भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील सेक्टर ६ चा भाग म्हणून २ एकर क्षेत्राचा पुनर्विकास होणार आहे. यात २३ जीर्ण इमारतींचा समावेश आहे. ५३ मजल्यांच्या २ टॉवरमध्ये सुमारे १२७८ निवासी आणि २६८ व्यावसायिक दुकाने असतील. ६३०० हून अधिक लोकांचे पुनर्वसन होईल. स्मार्ट सिटी प्रोटोटाइप म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात असून, या प्रकल्पात अनेक प्रकारे स्मार्ट शहरी क्लस्टरच्या आवश्यक गोष्टींचा समावेश आहे.
बिहाइंड द बाजारचा झाला अपभ्रंश
ब्रिटिश काळात क्रॉफर्ड मार्कटच्या मागच्या बाजूला वस्ती वाढत गेली. ती बिहाइंड द बाजार म्हणून ओळखली जायला लागली. तिचा अपभ्रंश होत भेंडी बाजार असाच उल्लेख केला जाऊ लागला व परिसरासाठी तेच नाव रूढ झाले, असा रंजक संदर्भही दिला जातो.
- २५० इमारती करण्यात आल्या जमिनदोस्त
- ३२०० कुटुंबे
- १,२५० दुकाने
- पुनर्विकासांतर्गत एकूण ११ इमारती उभ्या राहणार
- देशातील सर्वोत्तम क्लस्टर डेव्हल्पमेंट प्रोजेक्ट असल्याचा दावा.
- रहिवाशांच्या खिशातून एकही पैसा न घेता नव्या घरात प्रवेश.
- १०० वर्षांहून अधिक जुन्या इमारती, मोकळ्या जागांचा अभाव आणि कालबाह्य स्वच्छता सुविधांमुळे राहणीमानात घसरण.
भेंडी बाजारातील९०% पेक्षा जास्त लोक भाडेकरू म्हणून राहतात. यातील बहुतांश भाडेकरू २५० चौरस फूटपेक्षा कमी क्षेत्रात राहत आहेत.
- २००९ मध्ये दाऊदी बोहराच्या सैफी बुऱ्हाणी उत्थान प्रकल्पाच्या स्थापनेने भेंडी बाजारातील उन्नतीचा प्रवास सुरू.
- पुनर्विकास प्रकल्पामध्ये १६.५ एकर जमीन ९ स्वयंपूर्ण क्षेत्रांमध्ये विभागली गेली.
- ज्यामध्ये २५० हून अधिक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, ३२०० कुटुंबे आणि १२५० दुकाने.
- ७ ते ८ मीटर रुंदीचे अरुंद आणि गर्दीचे रस्ते जास्तीत जास्त १८ मीटर रुंद रस्त्यांनी बदलले जात आहेत.
- ३ हजार ४०० कार पार्किंग
- येथे एक झाड होते. आता ७०० झाडे लावली जात आहेत.
- निवासी आणि व्यावसायिक भाडेकरू त्यांच्या नवीन जागेचे मालक होत आहेत.
- अंजीरवाडी (माझगाव) येथे एक निवासी संक्रमण संकुल बांधण्यात आले.
- पुनर्विकास सुरू असताना निवासी भाडेकरूंना तात्पुरते निवास देण्यासाठी घोडपदेव, चुनाभट्टी येथे म्हाडाकडून अतिरिक्त घरे उपलब्ध करून देण्यात आली.
- भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१९-२०२० मध्ये पूर्ण.
- अल सा दाह टॉवर्स हे भेंडी बाजारातील पहिले दोन उंच टॉवर.
- ६१० हून अधिक कुटुंबे आणि १२८ दुकाने नवीन जागेत परत आली
- नवीन निवासी फ्लॅट्समध्ये किमान चटईक्षेत्र ३५० चौरस फूट.
- भेंडी बाजार येथील १६.५ एकरवर पुनर्विकासाचे काम
- ३६ आणि ४२ मजल्यांच्या दोन इमारती उभ्या राहिल्या
- दोन्ही इमारतींमध्ये ६१० कुटुंबांसह १२८ दुकानदारांना हक्कांचा निवारा
- दोन्ही इमारतींचे काम २०१६ साली सुरू
- ४५ महिन्यांत पूर्ण
सरकारच्या डीसीआर ३३ (९) च्या नियमन अंतर्गत हा प्रकल्प