Join us

ईव्हीएम विरोधात भीम आर्मीचे आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 8:43 PM

जेथे जेथे ईव्हीएम प्रणालीद्वारे निवडणुका घेतल्या गेल्या आहेत.

श्रीकांत जाधव

मुंबई :  जेथे जेथे ईव्हीएम प्रणालीद्वारे निवडणुका घेतल्या गेल्या आहेत. तेथे नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. ईव्हीएमचा निकाल सदोष आहे. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमद्वारे घेऊ नये, अशी जोरदार मागणी करीत भीम आर्मीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी सीसीएमटी स्थानक ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. मात्र,पोलिसांची महापालिका चौकात मोर्चा अडवला. तेव्हा आंदोलकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. 

भीम आर्मीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अविनाश गरुड, राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, सुनील गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.  राज्यातील सर्व निवडणुका ईव्हीएम प्रणालीद्वारे घेल्या जात आहेत. निवडणुकानंतर निकाल पाहता नागरिकांना धक्का बसतो. ज्यांना मतदान केले त्यांना ते मतदान न जाता भाजपाला मतदान जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सदोष प्रणालीचा राज्यातील निवडणुकासाठी वापर केला जाऊ नये अशी मागणी करीत मुंबईतील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सीसीएमटी स्थानकावरून आझाद मैदानात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी महापालिका चौकात मोर्चा येताच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आणि आझाद मैदानात सोडले. तेथे जोरदार घोषणाबाजी करीत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

थे नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. ईव्हीएमचा निकाल सदोष आहे. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमद्वारे घेऊ नये, अशी जोरदार मागणी करीत भीम आर्मीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी सीसीएमटी स्थानक ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. मात्र,पोलिसांची महापालिका चौकात मोर्चा अडवला. तेव्हा आंदोलकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. 