मुंबई- कथित माओवादी कनेक्शनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांची नजरकैद 4 आठवड्यांनी वाढवली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.ते म्हणाले, यांचं समर्थन करणं म्हणजे देशाच्या शत्रूंना साथ देण्यासारखंच आहे. कुठलाही राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाही, दिला तर ते जनतेपुढे उघडे पडतील. आमचा विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही. राजकीय हेतू, सज्जन लोकांना त्रास दिला जातोय काही लोक असं वातावरण तयार करत होते म्हणूनच त्यावेळी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषद घेणं योग्य की अयोग्य हा प्रश्न नाही, तर देशाच्या विरोधात षडयंत्र रचणा-यांना पोलिसांनी पकडलं हे महत्त्वाचं आहे.
Bhima Koregaon: पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 1:41 PM