Join us

भिवंडी-डोंबिवली लवकरच हाकेच्या अंतरावर

By admin | Published: August 23, 2014 1:02 AM

मोठागाव आणि माणकोली यांना जोडणा:या उल्हास खाडीवरील सहापदरी पुलाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आह़े या

नारायण जाधव - ठाणो
ठाणो-बेलापूर रस्त्यावरील 123 कोटींच्या तीन पुलांनंतर कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणा:या मोठागाव आणि माणकोली यांना जोडणा:या उल्हास खाडीवरील सहापदरी पुलाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आह़े या पुलावर सुमारे 28क् कोटी रुपये खर्च होणार असून, तो येत्या तीन वर्षात वाहतुकीसाठी खुला करण्याचा एमएमआरडीएचा मानस आह़े याशिवाय नवी मुंबईतील शीळ-महापे रस्त्यावरील वाहतूककोंडीस आळा घालण्यासाठी एल अॅण्ड टी जंक्शनजवळील 9क् कोटींचा पूल तर मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणो महामार्गास जोडण्याकरिता पनवेलच्या गाढी नदीनजीक 5क् कोटी खचरून दोन पूल बांधण्याच्याही निविदा प्रक्रियेस एमएमआरडीएने सुरुवात केली आह़े 
याशिवाय शीळ-महापे रस्त्यावर अडवली-भुतवली गावांनजीकच्या एल अॅण्ड टी जंक्शनवरही चारपदरी उड्डाणपूल आणि सेवारस्ता बांधण्यात येणार असून त्यावर 9क् कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ हा पूल आणि रस्ता झाल्यावर नवी मुंबईहून कल्याण-डोंबिवली आणि मुंब्रामार्गे ठाण्याला जाणा:यांची सोय होईल.
 ठाणो-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील कारखाने आणि आयटी पार्कमध्ये कल्याण-डोंबिवलीतून येणा:या हजारो नोकरदारांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे तामसेकर यांनी स्पष्ट केल़े पनवेलनजीक तक्का जंक्शनजवळ दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यातील एका पुलावर 1क् कोटी तर दुस:यावर 4क् कोटी खर्च करणार आह़े
 
च्सध्या डोंबिवलीकरांना भिवंडीत जाण्यासाठी कल्याणला वळसा घालून किंवा शीळफाटा-मुंब्रा बायपासमार्गे जावे लागत़े यात त्यांचा वेळ, श्रम आणि इंधनाचा अपव्यय होतो़ त्यामुळे डोंबिवलीच्या मोठागाव ते माणकोलीदरम्यान उल्हास खाडीवर पूल बांधून रस्ता केल्यास ही दोन्ही शहरे हाकेच्या अंतरावर येतील, असा प्रस्ताव माजी खासदार आनंद परांजपे यांनी आपल्या कार्यकाळात ते केंद्र सरकारच्या रस्ते बांधणी समितीवर असताना मांडला होता़ परंतु, तिवर आणि खाडीचा भाग असल्याने त्यास वने आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाचे ना-हरकत प्रमाणपत्र हवे होत़े ते मिळवण्यात एमएमआरडीएच्या अधिका:यांना यश आले आह़े 
 
च्त्यानुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी या मार्गाचा सव्र्हे केल्यानंतर आता प्रत्यक्षात या सहापदरी पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या असून, ते काम 28क् कोटी रुपयांचे असल्याचे एमएमआरडीएचे मुख्य अभियंता एस़बी़ तामसेकर यांनी लोकमतला सांगितल़े यात अडीच किलोमीटरचा पूल आणि एक किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश आह़े