भिवंडीचे महापौरपद शिवसेनेकडे
By admin | Published: December 12, 2014 01:29 AM2014-12-12T01:29:08+5:302014-12-12T01:29:08+5:30
वसेनेचे तुषार यशवंत चौधरी हे महापौरपदी तर काँग्रेसचे सिद्दीकी अहमद हुसैन उपमहापौरपदी निवडून आले.
Next
भिवंडी : गेल्या काही महिन्यांपासून तर्कवितर्कात अडकलेली महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक गुरुवारी झाली़ यात शिवसेनेचे तुषार यशवंत चौधरी हे महापौरपदी तर काँग्रेसचे सिद्दीकी अहमद हुसैन उपमहापौरपदी निवडून आले. राज्यात आपसात भांडणा:या शिवसेना व काँग्रेसच्या युतीला समाजवादीने भिवंडीत सहकार्य केल्याने हा चमत्कार घडला.
सभागृहात एकूण 9क् नगरसेवक उपस्थित होते. महापौरपदासाठी शिवसेनेचे तुषार चौधरी व कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे दोन उमेदवार रिंगणात होते. पीठासीन अधिकारी चóो यांनी नगरसेवकांना हात वर करून मतदान करण्याची सूचना देताच चौधरी यांना 87 मते तर विलास पाटील यांना अवघे एक मत मिळाले. दोन नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे महापौरपदासाठी तुषार चौधरी निवडून आले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सिद्दीकी अहमद हुसैन हे बिनविरोध निवडून आल्याचे पीठासीन अधिका:यांनी जाहीर केले.
महापौरपदाच्या निवडणुकीत अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिका:यांना निवडणूक घेणो भाग पडले. मात्र, उमेदवार विलास पाटील, महापौर प्रतिभा विलास पाटील व नितीन पाटील या पाटील कुटुंबीयांनी तुषार चौधरीस हात वर करून मते दिल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.
हा निर्णय घेण्यापूर्वी विलास पाटील व महापौर प्रतिभा पाटील सभागृहातच एकान्तात बोलत होते. या घटनेने सर्वाचे लक्ष वेधले होते. सर्व नगरसेवकांनी तुषार चौधरीस मते देत असताना नगरसेविका निशा नरेंद्र शेटे यांना निर्णय न घेता आल्याने ते प्रेक्षकागृहातील पतीच्या निर्देशाचा शोध घेऊ लागले. नंतर त्यांनी विलास पाटील यांना मत दिले. दोन नगरसेवकांनी मतदान न करता तटस्थ राहिले. (प्रतिनिधी)