Bhonga: पोलीस ॲक्शन मोडमध्ये, चित्रपटगृहातून 'भोंगा' काढला; मनसे नेत्यांचा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:46 PM2022-05-03T19:46:23+5:302022-05-03T19:56:06+5:30

औरंगाबादमधील सभेवरून राज्यातील वातावरण ईदच्या संध्येला तापू लागले आहे.

Bhonga: In police action mode, the ‘bhonga’ cinema was removed from the cinema; Intense anger of MNS leaders | Bhonga: पोलीस ॲक्शन मोडमध्ये, चित्रपटगृहातून 'भोंगा' काढला; मनसे नेत्यांचा तीव्र संताप

Bhonga: पोलीस ॲक्शन मोडमध्ये, चित्रपटगृहातून 'भोंगा' काढला; मनसे नेत्यांचा तीव्र संताप

Next

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' (Bhonga) या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली आहे. कारण, मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेच्या नेत्यांनी या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण केले आहे. त्यानुसार, आज मोठ्या पडद्यावर भोंगा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मनसेच्या संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. मात्र, आता हा चित्रपट सिनेमागृहात काढायला लावण्यात येत असल्याचं मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. 

औरंगाबादमधील सभेवरून राज्यातील वातावरण ईदच्या संध्येला तापू लागले आहे. औरंगाबाद पोलिसांनीराज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस फौजफाटादेखील वाढला आहे. दुसरीकडे आजच भोंगा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांकडून हा चित्रपट थेअटरमधून काढला जात असल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. 


अमेय खोपकर यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. '‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय. जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?', असा सवाल अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. 

सभेच्या आयोजकांवर विध कलमान्वये गुन्हा दाखल

राज ठाकरेंच्या सभेचे CCTV फुटेज रेकॉर्डिंगच्या तपासणी व अवलोकनात दिसून आले आहे. वर नमुद भाषणातील वक्तव्यामुळे सभेला उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला कारावासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध करण्यास चिथावणी मिळेल, त्यांचेकडून गंभीर शांतताभंग होईल, त्यांचेकडून सार्वजनिक प्रशांतता विरोधी अपराध घडेल, अगर दंग्या सारखा अपराध घडेल हे माहित असूनही बेछूट, चिथावणीखोर वक्तव्य करुन  पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर मार्फत त्यांना लेखी पत्राने घालून दिलेल्या व संयोजकाच्या बैठकीत समजावुन सांगितलेल्या अटी व शर्तीचा भंग केला, म्हणून राज ठाकरे, सभेचे आयोजक राजीव जावळीकर व इतर संयोजक यांच्याविरुध्द भादंवि कलम 116 117,153 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अभिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Bhonga: In police action mode, the ‘bhonga’ cinema was removed from the cinema; Intense anger of MNS leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.