Join us

कांदिवली पूर्व स्थानकाच्या सरकता जिन्याचे भूमीपूजन उत्साहात

By मनोहर कुंभेजकर | Published: June 01, 2023 1:12 PM

मोर्चा अशी विविध आंदोलने करून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले.

मुंबई : कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाचा सरकता जिना आता सुरु होणार आहे. मागील तीन वर्षांपासून हा जिना सुरु करण्यात यावा, यासाठी भाजप नेते व स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी उपोषण, मोर्चा अशी विविध आंदोलने करून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले.त्यांच्या  हस्ते आज या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, आज या सरकता जिना कामाचे भूमिपूजन झाले आहे. येणाऱ्या अडीच, तीन महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. कांदिवली पूर्व स्थानकाचा उपयोग करणारे अशोकनगर, चाणक्य नगर, पोईसर, ठाकूर कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणच्या हजारो नागरिकांना या कामामुळे दिलासा मिळणार आहे. याशिवाय गोशाळेजवळील बंद असलेला सरकत जिनाही येणाऱ्या काळात सुरु करण्यात येईल. मागील तीन वर्षापासून हा सरकता जिना बंद असणे हा २५ वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या 'कारभाराचा' हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. मुंबई पालिकेचा कारभार अत्यंत संथ गतीने आणि नियमांच्या जंजाळयात अडकवण्याचे काम आतापर्यंत केले होते, अशी टीकाही आमदार भातखळकर यांनी केली.

स्वागत प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवलकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक ठाकूर सागरसिग यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विधानसभेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.