मालाड माइंडस्पेस गार्डनमध्ये फ्लेमिंगो, दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठीच्या ट्विन टॉवर्सच्या कामाचे भूमिपूजन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 16, 2023 05:10 PM2023-02-16T17:10:09+5:302023-02-16T17:11:14+5:30

मुंबई - मालाड पश्चिम माइंडस्पेस गार्डनमध्ये अनेक वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. बर्‍याच पर्यावरणप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांनी या भागात ...

Bhoomipujan of twin towers works to see flamingos, rare birds at Malad Mindspace Garden | मालाड माइंडस्पेस गार्डनमध्ये फ्लेमिंगो, दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठीच्या ट्विन टॉवर्सच्या कामाचे भूमिपूजन

मालाड माइंडस्पेस गार्डनमध्ये फ्लेमिंगो, दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठीच्या ट्विन टॉवर्सच्या कामाचे भूमिपूजन

googlenewsNext

मुंबई - मालाड पश्चिम माइंडस्पेस गार्डनमध्ये अनेक वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. बर्‍याच पर्यावरणप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांनी या भागात दुर्मिळ प्रजाती, विशेषत: बागेच्या अगदी जवळ असलेल्या दक्षिण पश्चिम किनार्‍याच्या खाडीजवळ फ्लेमिंगोची नोंद केली आहे. पक्षी निरीक्षण आणि संशोधन करणाऱ्यांना पर्यावरण प्रेमींना तसेच सामान्य मुंबईकर जनतेला, निसर्गाला धक्का न लावता स्थलांतरित पक्षी निरीक्षण करता यावे यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान (उर्फ माइंडस्पेस गार्डन) येथे दोन टॉवर उभारण्याचा महापालिकेचा प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने सशर्त मंजूरी दिली.त्यानंतर आज आमदार विद्या ठाकूर, आमदार अस्लम शेख, माजी नगरसेवक दीपक ठाकूर आणि पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. 

हे ट्वीन टॉवर उभारत असताना, प्रस्तावित बांधकाम कोस्टल रेग्युलेशन झोन अधिसूचनेतील तरतुदींनुसार करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता  निशा दळवी यांनी दिली. तसेच पालिकेद्वारे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि स्वच्छतागृहांच्या विद्यमान सुविधा वाढवल्या जाणार तसेच पक्ष्यांवर  एलईडी लाईट्सचा त्रास होऊ नये याची देखील काळजी घेऊन शाश्वत ऊर्जेचा वापर म्हणून टॉवर्सच्या वर सौर पॅनेल देखील लावण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.

या टॉवरमुळे पक्षीनिरीक्षण वाढेल आणि स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण होईल तसेच दुर्मिळ पक्ष्यांबाबत लोकांमधील रुची वाढेल आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होईल असे राजेश अक्रे म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन एएलएम माइंडस्पेस मालाड यांनी केले होते. यावेळी महापालिका कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि कंत्राटदार जुगलकिशोर माळी उपस्थित होते.

Web Title: Bhoomipujan of twin towers works to see flamingos, rare birds at Malad Mindspace Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई