‘इतिहास समजून नवी समाजरचना करण्याचे भान ‘बलुत’ने दिले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:09 AM2018-09-21T05:09:50+5:302018-09-21T05:09:52+5:30

इतिहासात रममाण होता येत नाही. इतिहास हा समजून त्यावर मात केली पाहिजे.

'Bhootat' given the idea of ​​understanding new history, | ‘इतिहास समजून नवी समाजरचना करण्याचे भान ‘बलुत’ने दिले’

‘इतिहास समजून नवी समाजरचना करण्याचे भान ‘बलुत’ने दिले’

Next

मुंबई : इतिहासात रममाण होता येत नाही. इतिहास हा समजून त्यावर मात केली पाहिजे. त्याला ताब्यात घेऊन एक नवी समाजरचना निर्माण करण्याचे भान इतिहास देते. हाच संदेश आणि भान दया पवार यांच्या ‘बलुत’ने दिले. या साहित्यातील विचार लक्षात घेतला तर जीवन सार्थकी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.
दया पवार प्रतिष्ठान, ग्रंथाली वाचक चळवळच्या वतीने ‘बलुत’ या साहित्यकृतीला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष सोहळा गुरुवारी नरीमन पॉर्इंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडला. या निमित्ताने एक दिवसीय संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी रावसाहेब यांनी आपले विचार मांडले. यावेळी ग्रंथाली प्रकाशनाचे माजी विश्वस्त दिनकर गांगल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष शरद काळे, साहित्यिक कवी, रामदास फुटाणे उपस्थित होते. कसबे यांनी सांगितले की, १९७८ साली ‘बलुत’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लिहिलेले ‘झोत’ प्रकाशित झाले. त्यालाही आज ४० वर्ष पूर्ण होत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजात एक नवी विचारांची संस्कृती वाढत आहे, त्यामुळे दया पवार यांनी आपल्या बलुतमध्ये जे मांडले ते सत्यच आहे, यामुळे दलित समाजाने आता आत्मचिंतन करायला पाहिजे असे प्रतिपादन सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ग्रंथालीने बलुत नावाने पहिला पुरस्कार आदिवासी स्त्री लेखिका नजुबाई गावित यांना प्रदान केला़
>़़़ तर त्यांना खरा भारत समजेल
सरसंघचालकांनाही आता सत्य कबूल करण्याची वेळ आली आहे की, ज्या दिवशी सरसंघचालक जगाच्या सर्व मनुष्य जाती प्रमाणे आपली पण जात आहे, जी जगाच्या इतर जातीप्रमाणेच विकसित झाली असे म्हणतील, त्यावेळी त्यांना खरा भारत समजेल, असे स्पष्ट मत रावसाहेब यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Bhootat' given the idea of ​​understanding new history,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.