ओबीसींना देशोधडीला लावण्याचे भुजबळांचे कारस्थान; ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 09:59 PM2024-02-08T21:59:11+5:302024-02-08T21:59:33+5:30
श्रीकांत जाधव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओबीसी नेते छगन भुजबळ कोणाच्या तरी हाताचे बाहुले आहेत. एमईटी संस्थेने त्यांनी किती ...
श्रीकांत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओबीसी नेते छगन भुजबळ कोणाच्या तरी हाताचे बाहुले आहेत. एमईटी संस्थेने त्यांनी किती ओबीसींचे भले केले यांचे उत्तर द्यावे. भुजबळांनी ओबीसींना देशोधडीला लावण्याचे कारस्थान रचले असल्याचा आरोप ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी येथे केला.
राज्यात सलोखा राखण्यासाठी मराठा मोर्चा आंदोलनाच्या नेते जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना शिर्डीत एकत्र आणणार असल्याची घोषणाही डॉ. घुले यांनी यावेळी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी गुरुवारी परिषदेत हे आरोप केले.
भुजबळ यांच्या चितावणीमुळे गावागावात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद वाढले आहेत. एकमेकाचे तोंडही ते पाहत नाहीत. गरीब मराठ्यांसाठी जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे असे सांगताना भुजबळ यांनी त्यांच्या एमईटी संस्थेत किती ओबीसींना नोकऱ्या दिल्या ? किती मुलांना कामावर ठेवले ? याचे पहिले उत्तर द्यावे असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात कधीही मराठा ओबीसी दंगली घडू शकतात. त्याला भुजबळ जबाबदार राहतील. तेव्हा अशी चितावणीखोर भाषा त्यांनी टाळावी असेही डॉ. घुगे म्हणाले.