भूषण गगराणींनी भाकरी फिरवली! मुंबई मनपाच्या ७ उपायुक्त अन् १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 23:34 IST2025-03-28T22:57:53+5:302025-03-28T23:34:11+5:30

मुंबई महापालिकेतील सात उपायुक्त आणि बारा सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Bhushan Gagrani Transfers of 7 Deputy Commissioners and 12 Assistant Commissioners of Mumbai Municipal Corporation | भूषण गगराणींनी भाकरी फिरवली! मुंबई मनपाच्या ७ उपायुक्त अन् १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या

भूषण गगराणींनी भाकरी फिरवली! मुंबई मनपाच्या ७ उपायुक्त अन् १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना विषयक आदेश बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. 

Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार

१) विश्वास शंकरवार, सहआयुक्त यांची सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) येथे बदली करण्यात आली आहे. २) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त यांची उपायुक्त येथे बदली करण्यात आली आहे. ३) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त  यांची उपायुक्त ( परिमंडल ७) येथे बदली करण्यात आली आहे. 

शरद उघडे, सहायक आयुक्त (डी विभाग) यांची उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) ( माहिती तंत्रज्ञान विभाग) येथे बदली करण्यात आली आहे. अजित आंबी, सहायक आयुक्त यांची उपायुक्त येथे बदली करण्यात आली आहे, पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिसारण)यांची उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते)  येथे बदली करण्यात आली आहे.

विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) यांची उपायुक्त (परिमंडळ ३)  येथे बदली करण्यात आली आहे. 

सहायक आयुक्त संवर्गात बदली पुढीलप्रमाणे

१) विनायक विसपुते, सहायक आयुक्त यांची सहायक आयुक्त (सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे) येथे बदली करण्यात आली आहे.२) मनीष वळंजू, सहायक आयुक्त यांची सहायक आयुक्त (डी विभाग) ( सहायक आयुक्त, बाजार विभाग-अतिरिक्त कार्यभार) येथे बदली करण्यात आली आहे. ५) नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) यांची सहायक आयुक्त (बी विभाग)  येथे बदली करण्यात आली आहे.  ४) अलका ससाणे, सहायक आयुक्त (एम पूर्व विभाग) यांची  सहायक आयुक्त (एस विभाग)  येथे बदली करण्यात आली आहे.

सहायक आयुक्त संवर्गात पदस्थापना विषयक आदेश

१) दिनेश पल्लेवाड- सहायक आय़ुक्त, एच पश्चिम विभाग २) योगिता कोल्हे-सहायक आयुक्त, टी विभाग, ३) उज्वल इंगोले- सहायक आयुक्त,एम पूर्व विभाग, ४) अरुण क्षीरसागर- सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग

Web Title: Bhushan Gagrani Transfers of 7 Deputy Commissioners and 12 Assistant Commissioners of Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई